ना.धों. महानोरांनी केले राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक; पत्र पाठवून केले अभिनंदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजीपार्क मैदानावर केलेले घणाघाती भाषण चांगलेच गाजले. राजकीय वतुर्ळाने या चौफेर टोलेबाजी आणि वास्तववादी भाषणाची दखल तर घेतलीच पण साहित्य क्षेत्रात देखील ठाकरेंचे भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. अशाच एका कवी, गीतकार, शेतकरी साहित्यिक व्यक्तीला राज ठाकरेंच्या भाषणाने भुरळ घातली आहे. ते कवी म्हणे पद्मश्री ना. धों. महानोर. राज ठाकरेंच्या भाषणाने प्रभावित होऊन महानोरांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सभा संपल्याबरोबर एक पत्र लिहून राज ठाकरेंचे कौतुक आणि अभिनंदन केले.
ना.धों. महानोरांनी केले राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक; पत्र पाठवून केले अभिनंदन

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजीपार्क मैदानावर केलेले घणाघाती भाषण चांगलेच गाजले. राजकीय वतुर्ळाने या चौफेर टोलेबाजी आणि वास्तववादी भाषणाची दखल तर घेतलीच पण साहित्य क्षेत्रात देखील ठाकरेंचे भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. अशाच एका कवी, गीतकार, शेतकरी साहित्यिक व्यक्तीला राज ठाकरेंच्या भाषणाने भुरळ घातली आहे. ते कवी म्हणे पद्मश्री ना. धों. महानोर. राज ठाकरेंच्या भाषणाने प्रभावित होऊन महानोरांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सभा संपल्याबरोबर एक पत्र लिहून राज ठाकरेंचे कौतुक आणि अभिनंदन केले.

मराठी नववर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते आणि चाहत्यांना संदेश देणारे भाषण केले. अर्थात देशभरात लोकसभा निवडणुकीचा हंगाम असल्यामुळे या भाषणातून राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी, शहा आणि राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. यासाठी आपल्या व्यंगकलेचाही त्यांनी पुरेपूर उपयोग केला. निवडणुकीआधीचे मोदी आणि पंतप्रधान झाल्यानंतरचे मोदी यांच्यातील बदल त्यांच्याच विधानांचा संदर्भ चित्रफितीच्या माध्यमातून दाखवत राज ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या मनातील सलच व्यक्त केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

राज ठाकरेंच्या या घणाघाती भाषणाची दखल कवी ना.धों. महानोरांनी देखील घेतल्यामुळे राज ठाकरे यांचे भाषण किती प्रभावी झाले हे दिसून येते. महानोरांनी आपल्या पत्रात आणीबाणीच्या अस्वस्थेनंतर देशात झालेल्या निवडणुकीच्या काळात तेव्हा केलेल्या पु. ल. देशपांडेच्या भाषणाशी राज ठाकरे यांच्या भाषणाची तुलना केली. मुलगामी, मुद्देसूद आणि ऐकणाऱ्यांना संपूर्णपणे हलवणारे भाषण तसेच त्यात उत्सर्फूतपणा, जिवंतपणा होता अशा शब्दांत महानोरांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे वर्णण केले आहे.

काय म्हणाले महानोर, पत्र जसेच्या तसे..
......प्रिय श्री. सन्माननीय राज ठाकरे साहेब, अध्यक्ष मनसे, सप्रेम नमस्कार.
फार दिवस झाले औरंगाबादच्या विराट सभेतील आपल्या भेटीत खूप आनंददायी असं बोलणं झालं होतं. गुढीपाडव्याला शिवतीर्थावर आपण जे भाषण केले, ते अत्यंत अत्यंत मुलगामी, मुद्देसूद आणि ऐकणाऱ्यांना संपुर्ण हलवणारं होतं. उत्सर्फूतपणा व जिंवतपणा त्यात होता. आणि देशाप्रतीची खरी कळकळ होती.

व्यंग दाखवण्याची आणि त्याची सडेतोड चिरफाड करण्याची आपली कला जन्मजत आहेच. आणिबाणीच्या प्रचंड अस्वस्थतेनंतर निवडणुका आल्या. आदरणीय पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्रात विराट सभा घेऊन चिरफाड केली. ही महत्वाची ऐतिहासिक नोंद आहे. तेच आपण करताहेत. म्हणून आपला कवी व एक मित्र म्हणून आपलं लाख अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com