my rally will be bigger than ambedkar : Athwale | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

प्रकाश आंबेडकरांपेक्षा माझी सभा मोठी होईल : रामदास आठवले 

उमेश घोंगडे
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

पुणे : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात संविधान सन्मान सभा पुण्यात होणार असल्याचे समजले. त्यांची सभा मोठी व्हावीच! पण त्यापेक्षाही मोठी सभा माझी होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यात व्यक्त केला. 

केंद्रीय मंत्री आठवले व प्रकाश आंबेडकर आज पुण्यात होते. योगायोगाने दोघेही पुण्यात समोरासमोर असलेल्या शासकीय विश्रामगृहात एकाचवेळी होते. आंबेडकर यांची शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक होती तर त्याचवेळी मंत्री आठवले यांची पत्रकार परिषद सुरू होती.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या पुण्यात संविधान सभा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विचारले असता, आठवले यांनी वरील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ``कोरेगाव-भीमा येथे गेल्या एक जानेवारीला जी दंगल झाली त्याचा पुण्यात शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेशी काहीही संबध नाही. कोरेगाव-भीमा येथे गेल्यावर्षी झालेली दंगल एका दिवसात आटोक्‍यात आली. त्यात स्थानिक मराठा समाजाने केलेले सहकार्य महत्वाचे आहे. त्यामुळे वातावरण लवकर शांत होण्यास मदत झाली.``

आता एक जानेवारी जवळ आली आहे. विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी यावर्षीदेखील लाखो दलित बांधव येतील. या संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी सर्व समाजाचे स्थानिक नागरीक व प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. सर्वांनीच सहकार्याची आणि सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन आठवले यांनी केले. 
 
संबंधित लेख