Muttemwar Supporters Worried over Ashish Deshmukh | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

मुत्तेमवार समर्थक म्हणतात, 'आता, कसे होईल भाऊंचे' 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

आशीष देशमुख भाजप सोडणार हे काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र, ते कोणत्या राजकीय पक्षाकडे जातील , हे स्पष्ट झाले नव्हते. वर्धा येथे राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याचे संकेत आशीष देशमुख यांनी दिले आहेत. यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवतील, हे स्पष्ट झाले आहे.

नागपूर : आशीष देशमुखांनी आमदारकीचा राजीनामा देऊन थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्याने नागपुरातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या विलास मुत्तेमवार यांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच मुत्तेमवारांच्या समर्थकांमध्ये 'आता कसे होईल, भाऊचे' असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

आशीष देशमुख भाजप सोडणार हे काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र, ते कोणत्या राजकीय पक्षाकडे जातील , हे स्पष्ट झाले नव्हते. वर्धा येथे राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याचे संकेत आशीष देशमुख यांनी दिले आहेत. यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवतील, हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे आशीष देशमुखांनी स्पष्ट केल्याने नागपुरातील विलास मुत्तेमवार यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे तर शहरातील असंतुष्ट गट 'बरे झाले' अशी प्रतिक्रिया देत आहेत. 

मुत्तेमवार यांनी 1998 पासून 2014 पर्यंत नागपूर लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी विलास मुत्तेमवार यांचा 2 लाख 75 हजारांवर मताधिक्‍यांनी पराभव केला. या पराभवानंतरही मुत्तेमवार यांनी हातातील हत्यार टाकलेले नाही. 'बचेंगे तो और भी लढेंगे' असे म्हणत गडकरींना लढत देण्यास ते इच्छुक आहेत. 

नागपुरातील निवडणूक लढण्यास काँग्रेसमध्ये जवळपास दहाजण इच्छुक आहेत. यात आणखी आशीष देशमुखांची भर पडल्याने मुत्तेमवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. आशीष देशमुखांच्यापूर्वी माजी खासदार नाना पटोले, माजी मंत्री नितीन राऊत, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, प्राचार्य बबनराव तायवाडे, माजी मंत्री अनीस अहमद आदींचा समावेश आहे. यासर्वांमध्ये आशीष देशमुख उजवे ठरणारे उमेदवार आहेत. आशीष देशमुखांच्या कॉंग्रेस प्रवेशावर मुत्तेमवार गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी वर्धा येथे थेट सोनिया गांधी यांच्याशी व्यासपीठावर संवाद साधल्याने देशमुखांची 'धाव' थेट 10 जनपथपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 

संबंधित लेख