muttemvar and gadkari | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

गडकरी बोले, महामेट्रो चाले - विलास मुत्तेमवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नागपूर : नागपूर महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांना बाजूला सारून तसेच नियमांना बगल देऊन महामेट्रोकडे शहरातील विकासाचे अनेक प्रकल्प सोपविले जात आहे. यामागे विकास कामांमधील भ्रष्टाचारांवर पांघरून घालण्याचा हेतू असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केला. 

नागपूर महापालिकेची अनेक कामे महामेट्रोकडे वर्ग केली आहेत. यामुळे महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. परंतु कुणीही नाराजी उघडपणे बोलायला तयार नाही. या संदर्भात बोलताना मुत्तेमवार म्हणाले, नागपूर महापालिका ही जनतेनी निवडून दिलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ही संस्था राज्यसरकार व केंद्र सरकारचे अनेक उपक्रम व प्रकल्प राबवित आहे. महामेट्रो हे महामंडळ केवळ शहरातील मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी आहे. हे असताना नागपूर महापालिकेच्या अखत्यारित असलेली कामेही महामेट्रोला देण्यामागे काय हेतू आहे? असा सवाल मुत्तेमवार यांनी केला. 

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना गडकरींचा आशीर्वाद आहे. महामेट्रोकडे काम गेल्यामुळे या कामासाठी कंत्राटदार निवडीचे अधिकार महामेट्रोकडे राहणार आहेत. आपल्या पसंतीच्या कंत्राटदारांना निविदा देण्यासाठी महामेट्रोचा वापर केला जाणार आहे. विकास कामांमधील भ्रष्टाचार उघड होऊ नये, यासाठी नितीन गडकरी प्रत्येक काम महामेट्रोकडे वर्ग करीत असल्याचा आरोप मुत्तेमवार यांनी केला. 
 
संबंधित लेख