mutemwar and pande | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

गटबाजीमुळे मुत्तेमवार, पांडे भंडाऱ्यातून कॉंग्रेसचे प्रतिनिधी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

नागपूर : भंडारा जिल्हा कॉंग्रेसने नागपुरातील नेते विलास मुत्तेमवार व अविनाश पांडे यांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून पाठविले. नागपूर शहरातील गटबाजीमुळे या दोन्ही नेत्यांना भंडाऱ्यातून प्रदेश कॉंग्रेसवर पाठविण्यात आल्याचे समजते. नागपुरात राजकारण करणाऱ्या या नेत्यांना भंडारा जिल्ह्यातून पाठविल्याने स्थानिक नेत्यांवर अन्याय झाल्याची चर्चा आहे. 

नागपूर : भंडारा जिल्हा कॉंग्रेसने नागपुरातील नेते विलास मुत्तेमवार व अविनाश पांडे यांना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीवर प्रतिनिधी म्हणून पाठविले. नागपूर शहरातील गटबाजीमुळे या दोन्ही नेत्यांना भंडाऱ्यातून प्रदेश कॉंग्रेसवर पाठविण्यात आल्याचे समजते. नागपुरात राजकारण करणाऱ्या या नेत्यांना भंडारा जिल्ह्यातून पाठविल्याने स्थानिक नेत्यांवर अन्याय झाल्याची चर्चा आहे. 

राज्यातील प्रत्येक जिल्हा कॉंग्रेसमधून प्रदेश कॉंग्रेसवर प्रतिनिधी पाठवावे लागतात. भंडारा जिल्ह्यातून 9 प्रतिनिधी प्रदेश कॉंग्रेसवर पाठविता येतात. भंडारा जिल्ह्यातील तुमसर ब्लॉकमधून माजी खासदार अविनाश पांडे यांना तर मोहाडी ब्लॉकमधून माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना पाठविण्यात आले आहे. या वृत्ताला भंडारा जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दुजोरा दिला. 

भंडारा जिल्ह्यातून विलास मुत्तेमवार व अविनाश पांडे यांना पाठविण्याचा निर्णय जिल्हा कॉंग्रेसचा आहे. त्यासाठी कुणीही काहीही सूचना दिल्या नव्हत्या. हे दोन्ही नेते कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ आहेत. त्यांना भंडारा जिल्ह्यातून प्रदेशवर पाठविणे हे भंडारा जिल्हा कॉंग्रेससाठी सन्मानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. 

नागपूर शहरातील जोरदार गटबाजी उफाळली आहे. या गटबाजीमुळे मुत्तेमवार व पांडे यांना भंडारा जिल्ह्यातून प्रदेश कॉंग्रेसवर पाठविण्याचा नामुष्की नागपूर शहर कॉंग्रेसवर आली. नागपूर शहर कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यातून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांना प्रदेश कॉंग्रेसवर प्रतिनिधी म्हणून पाठवायचे नाही, अशी नीती नागपूर शहर कॉंग्रेसने आखली होती, असे समजते. या गटबाजीमुळे नागपूर शहर कॉंग्रेसची संघटनात्मक निवडणुकाही पार पडल्या नाहीत. यामुळे प्रदेश कॉंग्रेसवर नागपूर शहरातून एकही प्रतिनिधी पाठविण्यात आला नाही. 
 

संबंधित लेख