Municipal commissioner is an engineer | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातूनच आरक्षण : मुख्यमंत्री
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

आयुक्त हर्डीकर आहेत इंजिनिअर 

उत्तम कुटे
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

यवतमाळ येथे असताना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे. 2005 च्या आयएएस बॅचचे ते अधिकारी असून राज्यात ते आयएएस परीक्षेत पहिले आले होते.कोल्हापूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी ही त्यांची पहिली पोस्टिंग होती.

पिंपरी:  डोंबीवलीकर  असलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हिंजवडी येथील विप्रो इन्फोटेक लि.या आयटी कंपनीत सिस्टिम इंजिनिअर म्हणून आपल्या करियरची सुरवात केलेली आहे. त्यांच्या रूपाने उद्योगनगरीला सलग दुसरे इंजिनिअर आयुक्त मिळाले आहेत.

रेखाचित्रणाचा छंद असल्याने विविध विकासकामांचे आराखडे त्यांना सहजपणे समजत आहेत. तर, बी.ई.(इन्स्ट्रूमेंटेशन)असल्याने सर्वाधिक खर्च आणि कामे निघणाऱ्या स्थापत्य विभागावरही त्यांची मजबूत पकड राहणार आहे. 

तंत्रज्ञ आणि त्यातही आयटी तज्ज्ञ (इंजिनिअर) असल्याने ऑनलाइन कामावर त्यांचा अधिक भर आहे. त्यामुळे ऑनलाइन सेवा देणार असून शहरातील नागरिकांनीही त्याला तसाच प्रतिसाद द्यावा,अशी त्यांची इच्छा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्‍वासू अधिकारी असून मुख्यमंत्र्यांच्याच शहरात म्हणजे नागपूर येथे यापूर्वी काम करीत होते. तेथे त्यांनी नागपूर मेट्रोचा प्रश्‍न मार्गी लावल्याने पिंपरी-चिंचवडसह पुण्यातही मेट्रो लवकर रुळावर येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यवतमाळ येथे असताना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे. 2005 च्या आयएएस बॅचचे ते अधिकारी असून राज्यात ते आयएएस परीक्षेत पहिले आले होते.कोल्हापूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी ही त्यांची पहिली पोस्टिंग होती.रत्नागिरी,नंदूरबार, नांदेड, यवतमाळ,मुंबई आणि नागपूर येथे त्यांनी यापूर्वी काम केलेले आहे. 

मावळते आयुक्त दिनेश वाघमारे हे सुद्धा इंजिनिअर बीई (मेकॅनिकल) होते. ते "आयआयटी' ही होते. तर, हर्डीकर हे सुद्धा बीई (इन्स्ट्रुमेंटेशन) आहेत. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर युपीएससी परीक्षेत त्यांची महसूल सेवेत (आयआरएस) निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी आयएएस केले.क्रिकेट, टेनिस आणि बॅडमिंटनचे ते चाहते असून वन्यजीवन व पक्षीनिरीक्षणाचा त्यांना छंद आहे. 

संबंधित लेख