कुणी राजीनामा मागितल्याने माझे खाते जात नाही : मुनगंटीवारांचा मनेका गांधींना टोला

कुणी राजीनामा मागितल्याने माझे खाते जात नाही : मुनगंटीवारांचा मनेका गांधींना टोला

पिंपरी : कुणी राजीनामा मागितल्याने माझे खाते राहत नाही वा माझे प्रमोशनही होत नाही, या शब्दांत राज्याचे वन आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यावर गुरुवारी पिंपरीत पलटवार केला. सच परेशान हो सकता, है,पराजित नही. क्‍योंकी सच सच होता है, असेही ते अवनी प्रकरणावर बोलताना म्हणाले. नर्सरी असोसिएशनच्या राष्ट्रीय प्रदर्शनाच्या उदघाटनानंतर मुनगंटीवर बोलत होते. अवनी वाघीणीच्या शिकार प्रकरणात मनेका गांधींनी पुन्हा केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर मुनगंटीवारांनी वरील वक्तव्य केले. त्यातून केंद्र व राज्याच्या मंत्र्यातील कलगीतुरा सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

माझ्या राजीनाम्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, असे वनमंत्री म्हणाले. जेव्हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवितील,तेव्हा यावर निर्णय होईल, असे सांगत मनेका गांधींनी केलेली राजीनाम्याची मागणी त्यांनी साफ फेटाळून लावली. गांधींनी माझा राजीनामा मागायचा व मी त्यांचा हे राजकारणात अपेक्षित नाही, असे ते खेदाने म्हणाले. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याने राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या तयारीत असल्याचे मुनगंटीवारांनी सूचित केले. 

आरक्षणामुळे पडणारा आर्थिक भार पेलण्यास सरकार तयार आहे, असे ते म्हणाले. ती आमची वैधानिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचेवळी आरक्षण हे आगामी निवडणुकीत मते मिळविण्यासाठी नसून सत्ता टिकविण्याकरिताही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीशी या आरक्षणाचा सबंध नसून ते टिकाऊ आहे, असेही ते म्हणाले. न्यायालयात आरक्षण टिकावे, यासाठी सरकार तर्कसंगत भूमिका घेत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com