Mundhe to Continue as PMPML Chairman | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

बदली होऊनही पीएमपीच्याही अध्यक्षपदी तुकाराम मुंढेच

मंगेश कोळपकर
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनडीटीए) अध्यक्षपदी गुरुवारी निवड केली. मात्र, मुंढे पीएमपीच्याही अध्यक्षपदी राहणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. पीएमपीच्या अध्यक्षपदी आणि आता पीसीएनडीटीएच्या अध्यक्षपदी मुंढे राहणार आहेत. त्यातील कोणत्या पदाची सूत्रे अतिरिक्त, हे राज्य सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

पुणे : पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनडीटीए) अध्यक्षपदी गुरुवारी निवड केली. मात्र, मुंढे पीएमपीच्याही अध्यक्षपदी राहणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. पीएमपीच्या अध्यक्षपदी आणि आता पीसीएनडीटीएच्या अध्यक्षपदी मुंढे राहणार आहेत. त्यातील कोणत्या पदाची सूत्रे अतिरिक्त, हे राज्य सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

मुंढे यांची मार्च रोजी पीएमपीमध्ये नियुक्ती झाली. त्यांनी धडाक्‍यात काम सुरू केले. दोन्ही महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा सुरवातीला खटका उडाला. परंतु, त्यानंतर दोन्ही महापालिकाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे मनोमिलनही झाले. मात्र, पीएमपीचे अध्यक्षपदासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्याची पूर्णवेळ आवश्‍यकता नाही, असेही मत प्रशासकीय वर्तुळात व्यक्त झाले होते. राज्य सरकारपर्यंतही हे मत पोचविण्यात आले होते. एका अधिकाऱ्याने तर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा आणि महापालिका आयुक्तांकडेच त्याचे अध्यक्षपद ठेवावे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचविले होते.

या पार्श्‍वभूमीवर मुंढे यांनीही शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या समन्वयाचे काम पीएमपीकडे द्यावे, असा प्रस्ताव सादर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर 'पीसीएनडीटीए'च्या अध्यक्षपदी मुंढे यांची नियुक्ती करतानाच त्यांना पीएमपीमध्येही राज्य सरकारने अध्यक्ष म्हणून ठेवले आहे. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडमध्येही स्वतंत्रपणे मुंढे यांची 'इनिंग' सुरू होईल. मुंढे हे 2005च्या बॅचचे आयएएस आहेत. नवी मुंबईतील आयुक्तपदाची त्यांची कारकीर्द व त्यानंतर झालेली बदली, याबद्दल राज्यात चर्चा झाली होती. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसांत पीसीएनडीटीएची सूत्रे स्वीकारणार असल्याचे मुंढे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.

 

संबंधित लेख