munde tells love story in Buldhana | Sarkarnama

धनंजय मुंडे यांनी बुलढाण्यात सांगितली एक प्रेमकथा!

संजय जाधव
रविवार, 20 जानेवारी 2019

बुलढाणा : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या समारोपाच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी आज जोरदार फटकेबाजी करत एक गोष्टही सांगितली. ही गोष्टी होती मुलगी आणि वाघाच्या प्रेमाची म्हणजेच भाजप आणि शिवसेनेच्या युतीबद्दलची!

बुलढाणा : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या समारोपाच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी आज जोरदार फटकेबाजी करत एक गोष्टही सांगितली. ही गोष्टी होती मुलगी आणि वाघाच्या प्रेमाची म्हणजेच भाजप आणि शिवसेनेच्या युतीबद्दलची!

ही गोष्टी अशी.  एका मुलीचे प्रेम वाघावर होते. मुलीने वाघाला म्हटले की, तुझे माला नखे लागतील तेव्हा वाघाने नखे कापून टाकली. दुसऱ्या वेळेस मुलीने पुन्हा वाघाला म्हटले की तुझे सुळे दात लागतील. तेव्हा वाघाने दाताही काढून टाकले. मग वाघाच्या लक्षात आले की आपली गत कुत्र्यासरखी  झाली आहे. दुसऱ्या वेळेस जेव्हा वाघ त्या मुलीला भेटला तेव्हा त्या मुलीने त्या वाघाला कुत्र्यासारखी बदडले. ही गोष्ट तुम्हाला समजले असेल की वाघ कोण व मुलगी कोन हे माला विचारु नका, अशी खिल्ली मुंडे यानी आपल्या भाषणातून उडविली.

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून समृद्धी महामार्ग जाणार आहे. जर तसे झाले तर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या. हीच त्यांना आणि आपले आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांना खरी मानवंदना ठरेल, अशी मागणी त्यांनी केली.

या भागात भाजपचा आमदार आहे, शिवसेनेचा खासदार आहे. मात्र डॉ. राजेंद्र शिंगणे मंत्री असताना जितका विकास या परिसरात झाला, तितका विकास कोणताच नेता करू शकणार नाही. तुमची साथ या परिवर्तनाला असू द्या, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित लेख