Munde Sisters Bullet Ride in BJP Vijay Sankalp Yatra | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

'विजयी संकल्प'च्या निमित्ताने मुंडे भगिनींची बुलेट प्रचाराच्या दुसऱ्या फेरीसाठी सज्ज

दत्ता देशमुख
सोमवार, 4 मार्च 2019

पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांनी विकास कामांच्या निमित्ताने मागच्या महिन्यात जिल्ह्यातील सहाही मतदार संघाचा ऐकेक दौरा पुर्ण केला. रविवारी विजयी संकल्प फेरीत या भगीनींनी सहभाग घेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

बीड : मागच्या महिन्यात विकास कामांच्या उद॒घाटन व भूमिपुजन कार्यक्रमांच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी जिल्ह्यातील सहाही मतदार संघाचा एक दौरा पूर्ण केला आहे. रविवारी विजयी संकल्प फेरीच्या निमित्ताने या भगीनींनी बुलेटवर सवारी केल्याने आता प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात केल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीत मात्र उमेदवारीवरुन खल सुरु आहे.

बीड लोकसभा मतदार संघातून खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उमेदवारीवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दोन महिन्यांपूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे. तेव्हापासून विविध माध्यमांतून या दोन्ही भगीनींचा प्रचार सुरु झाला आहे. गेल्या महिन्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या खात्यांतर्गत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, 2515 अंतर्गत रस्ते, नाली, सभागृह, मुख्यमंत्री पेयजल योजना अशा विविध विकास कामाची उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पनाच्या निमित्ताने या दोघी बहिणींनी जिल्ह्याचा एक दौराही पूर्ण केला. रविवारी जिल्हाभरात भाजपची विजयी संकल्प फेऱ्या निघाल्या.

खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी गेवराई, बीड येथ सहभाग घेऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. तर, सायंकाळी परळीत निघालेल्या दुचाकी फेरीत या दोन्ही बहीणी सहभागी झल्या. ‘फिर मोदी को लाना है, देश को बचाना है’ या गितामुळे वातावरण भाजपय झाले होते. गोपीनाथ गडावरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेवून ही फेरी मार्गस्थ झाली. सुरुवातीला पंकजा व प्रितम या दोन्ही बहिणींनी बुलेटवर स्वार होत कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर उघड्या जीपमधून फेरीत सहभागी होत नागरिकांना हात उंचावून अभिवादन करत त्यांचे स्वागत स्विकारले. या फेरीच्या निमित्ताने भाजपच्या लोकसभा प्रचाराच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीत मात्र उमेदवारीवरुन खल सुरु आहे.

फोटो फीचर

संबंधित लेख