Munde should focus on improving bus service - Seema Savle | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मुंडेंनी पिंपरीतील  बस सेवा कार्यक्षम करावी - सीमा सावळेंचा टोला 

उत्तम कुटे - सरकारनामा वृत्त
सोमवार, 12 जून 2017

""गेल्या दहा वर्षात पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या दुप्पट झाली असून पीएमपीएमएलची सेवा आणि बससंख्या,मात्र तेवढीच राहिल्याने शहरवासीयांना त्याची मोठी झळ सोसावी लागत आहे.त्यातही पालिकेच्या समाविष्ट  गावांत,तर या सेवेची बोंबच आहे''.
-सीमा सावळे

पिंपरी  :  प्रामाणिक प्रतिमा जपण्यापेक्षा "पीएमपीएमएल'चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकांची संयुक्त परिवहन कंपनी असलेली "पीएमपीएमएल' सक्षम करावी . विशेष करून पिंपरी-चिंचवडच्या अंतर्गत भागातील बसव्यवस्था सुधारावी'',असे खुले आव्हान पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी  दिले. 

त्यामुळे मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडला भेट द्यावी, या मागणी वरून गेल्या काही दिवसांपासून या दोन फायरब्रॅण्ड
अधिकारी व पदाधिकाऱ्यांतील संघर्ष सुरूच राहिला आहे. परिणामी या कंपनीला  पिंपरी पालिकेकडून देय असलेले पावणेसहा कोटी रुपये महिन्याभरापासून अडकून पडले आहेत.

शहरवासीयांच्या पीएमपीएमएलविरुद्धच्या तक्रारी आणि मागण्या ऐकून घेण्यासाठी मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये असा सावळे यांचा आग्रह आहे. तर, त्याला मुंढे यांनी नकार दिलेला आहे. 

त्यामुळे पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने संचलन तुटीपोटी देय असलेली पावणेसहा कोटी रुपयांच्या
निधीला मंजुरी दिलेली नाही.मुंढे येईपर्यंत ती न देण्याचे समितीने ठरविलेले आहे. त्यावरून पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी  झालेल्या बैठकीतही मुंढे आणि सावळे यांच्यात वादावादी झाली होती.
त्यात सावळे यांनी आणखी भर टाकली.

संयुक्त परिवहन कंपनीत पिंपरी पालिकेचा चाळीस टक्के वाटा असल्याने तेवढ्या बसेस आणि तेवढी सेवा शहराला मिळालीच पाहिजे, असे त्यांनी पुन्हा एकवार आज स्पष्ट केले. 

"लेडीज स्पेशल, शहर दर्शन बससेवा अशा अनेक बाबतीत
कंपनीकडून पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडला दुजाभावाची वागणूक
 मिळते  . एमआयडीसीत बससेवा अत्यंत तुटपुंजी असून तेथे ये-जा करताना चाकरमान्यांना मोठी कसरतच करावी लागत असल्याने प्रथम तेथील व त्याजोडीने शहराच्या अंतर्गत भागातील बससेवा मुंडे  यांनी
सक्षम करावी," असे त्या म्हणाल्या. 

"शहर बस सेवेचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्या ऐवेजी  आल्यापासून उत्पन्नात एवढी वाढ झाली असे सांगणे म्हणजे धूळफेक आहे .  पुण्याप्रमाणे उद्योग नगरीतही प्रत्येक भागात बस धावली पाहिजे. "

"एमआयडीसीतील कामगारांना बससाठी काय अग्निदिव्य करावे लागते, हे मुंढे यांनी शहराला भेट देत त्याची पाहणी करीत आपली कार्यक्षमता सिद्ध करावी",असे आव्हानच त्यांनी दिले आहे. दरम्यान,सावळे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मुंढे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

संबंधित लेख