Munde saheb I will suspend you : Mayor Ranjana Bhansi | Sarkarnama

मुंडे साहेब नगरसेवकांच्या ऐका नाही तर बडतर्फ करीन :महापौर रंजना भानसी

संपत देवगिरे
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून माझा माईक अन माझंच ऐक या भूमिकेत तुकाराम मुंडे आहेत.

-महापौर भानसी 

नाशिक  : महापालिकेच्या महासभेत आज विरोधकांनी डेंग्यूच्या प्रश्नावर सत्ताधारी भाजपला चांगलेच कोंडीत पकडले. या वादाने त्रस्त महापौर रंजना भानसी यांनी हिंमत करून आयुक्त तुकाराम मुंडे यांना फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. "आयुक्त  साहेब नगरसेवकांना विश्वासात घ्या, अन्यथा थेट बडतर्फ करीन" असे सुनावले.

आजची महासभा चांगलीच गजाली. शिवसेना, दोन्ही काॅग्रेसने विरोधी पक्षांनी शहरातील महापालिका रूग्णालयांतील अव्यवस्था व डेंग्यूच्या आजाराने झालेल्या मृत्यूबाबत प्रशांत न व सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी केली. शिवसेनेने निषेधाच्या घोषणा देत 'शहर डेंग्यूने त्रस्त, सत्ताधारी मात्र मस्त' अशा घोषणा रंगवल्या होत्या. 

त्यामुळे महापौर भानसी यांनी आयुक्त  पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून माझा माईक अन माझंच ऐक या भूमिकेत  तुकाराम मुंडे आहेत. असे चालणार नाही. मुंडे यांना आज संतप्त झालेल्या महापौर रंजना भानसी यांनी अक्षरशः फैलावर घेतले. हुकूमशाही पद्धतीने काम चालू देणार नाही असे खडसावत  लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम न केल्यास सत्ताधारी पक्षाची असले तरी महापालिकेचे कामकाज चालू देणार नाही.  अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना दाद न दिल्यास थेट निलंबनाचा ईशारा दिला.

त्यामुळे महापौर भानसी यांचा आजचा 'रोल' चर्चेत राहिला.

संबंधित लेख