munde and nashik people | Sarkarnama

पाठिंब्यासाठी आभार, मी शासनाचा नोकर, शासन सांगेल तिथे जाईन - तुकाराम मुंडे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

शहरातील विविध सामाजिक संघटनांनी अविश्‍वास प्रस्तावाच्या विरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठिंबा दिला. गोल्फ क्‍लब मैदानापासून महापालिका राजीव गांधी भवन पर्यंत रॅली काढली. त्यात मोठ्या संख्येने नागीरक सहभागी झाले. ही रॅली महापालिका प्रवेशद्वारावर अडवली. तेव्हा आयुक्तांनी प्रवेशद्वारावर येऊन नागरिकांचे आभार मानले.

नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. या विरोधात नाशिकमधील अनेक नागरिकांनी आज गोल्फ क्‍लब मैदान ते महापालिका मुख्यालयापर्यंत "वॉक फॉर कमिशनर' रॅली काढली. मुंढे यांनी महापालिका प्रवेशद्वारावर येऊन नागरिकांचे आभार मानले. शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारले. यावेळी ते म्हणाले, "मी शासनाचा नोकर आहे. शासनाचा आदेश ऐकतो. शासन सांगेन तिथे जाऊन काम करतो. आता नाशिकच्या विकासासाठी काम करतो आहे.' 

शहरातील विविध सामाजिक संघटनांनी अविश्‍वास प्रस्तावाच्या विरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठिंबा दिला. गोल्फ क्‍लब मैदानापासून महापालिका राजीव गांधी भवन पर्यंत रॅली काढली. त्यात मोठ्या संख्येने नागीरक सहभागी झाले. ही रॅली महापालिका प्रवेशद्वारावर अडवली. तेव्हा आयुक्तांनी प्रवेशद्वारावर येऊन नागरिकांचे आभार मानले.

समाधान भारतीय, जितेंद्र भावे, हंसराज वडघुले, माधवी रहाळकर, माधुरी भदाने, सचिन मालेगावकर, विश्‍वास वाघ यांनी आयुक्तांच्या कार्यालयात त्याना पत्र दिले. यावेळी नागरिकांनी विचारले नगरसेवक म्हणतात आपण उध्दट आहात. लोकांची कामे करीत नाही. हे खरे आहे का?. यावर मुंढे यांनी मी सगळ्यांचे स्वागत करतो. तक्रारी ऐकतो. कोणीही मला थेट भेटु शकतो. त्यांनी सर्व माहिती व फाईल्स दाखवल्या. ते म्हणाले, "मी शासनाचा नोकर आहे. शासन देईल त्या आदेशाचे पालन करतो. शासन पाठवेल तिथे जाऊन काम करतो. आता नाशिकला आहे. शहराचा विकास करण्यास मी बांधील आहे.' 

संबंधित लेख