munde and khotkar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

... तुम्हाला हिंद केसरी खेळायची आहे का ? धनंजय मुंडेचा खोतकरांना टोला

आदित्य वाघमारे
रविवार, 23 डिसेंबर 2018

जालना : महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून अर्जून खोतकर यांना हिंद केसरी खेळायची आहे का ? अर्थात मुंबईहून दिल्लीला जाण्याचा तर तुमचा विचार नाही ना ? असा जोरदार टोला विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना लगावला. पाच दिवसापासून सुरू असलेल्या 62 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या रविवारी (ता. 23) झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय मुंडे बोलत होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार येणार होते. पण त्यांचा दौरा अचनाक रद्द झाल्यामुळे धनंजय मुंडे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. 

धनंजय मुंडे यांनी भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन अर्जून खोतकर यांनी केल्याचे सांगत, त्यांना महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून हिंद केसरी तर खेळायची नाही ना? असा चिमटा काढला. त्यांच्या या कोटीला प्रेक्षकांनी खचून भरलेल्या मैदानानेही दाद दिली. मुख्यमंत्री देखील या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी येणार होते असे ऐकले होते, ते आले असते तर मातीतली वेगळी कुस्ती येथे पहायला मिळाली असती. आम्ही पक्षभेद विसरून आलो पण आपल्या मित्र पक्षाचे लोक इथे दिसत नाहीत? असा टोला देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी लगावला. 
 
संबंधित लेख