munde and bhujbal conflict | Sarkarnama

आयुक्त मुंढेंच्या करवाढीविरोधात आता समीर भुजबळ मैदानात, 10 सप्टेंबरला मोर्चा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

नाशिक : गेले दोन महिने चर्चा, टीका आणि राजकीय वादाचा विषय ठरलेल्या करवाढीविरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने शस्त्र उपसले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे सध्या भाजप, शिवसेनेच्या नगरसेवकांच्या विरोधाला सामोरे जात आहेत, त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची भर पडली आहे. करवाढ मागे घ्या अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल. त्यासाठी 10 सप्टेबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महापालिके विरोधात मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिला आहे. 

महानगरपालिकेतील अन्यायकारक करवाढ सरसकट रद्द करावी. नाशिककरांच्या विविध प्रश्नांबाबत शासनस्तरावर हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळासोबत नाशिकच्या विभागीय आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यात करवाढ सरसकट रद्द न केल्यास महापालिकेविरोधात मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानुसार नाशिक महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 

माजी खासदार भुजबळ म्हणाले, महानगरपालिकेने केलेली अवास्तव करवाढ ही असमर्थनीय आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर 30 ऑगस्ट रोजी मनपा प्रशासनाने निवासी मालमत्तांच्या करयोग्यमूल्य दरात सरासरी 50 टक्के तर अनिवासी व व्यावसायिक मालमत्तांच्या करयोग्यमूल्यात 25% कपात करण्याचे जाहीर केले आहे. केवळ मलमपट्टी करण्याकरीता थोडीफार करवाढ कमी करून नाशिककरांची दिशाभूल करण्यात आलेली आहे. वस्तुतः जर आधीच संपूर्ण करवाढ रद्द केली असती तर शहरात एवढा मोठा गोंधळ व जनक्षोभ निर्माण झाला नसता. त्यामुळे आम्हाला 30 ऑगस्टचा निर्णयही मान्य नसून सदर करवाढ सरसकट रद्द करण्याची आमची मागणी आहे. नाशिककरांवर लादलेली ही अन्यायकारक जिझिया करवाढ सरसकट मागे घेतली जावी अशी आमची भूमिका आहे. 

संबंधित लेख