mumbaikar bhadekaru raj purohit | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मुंबईकर जुने भाडेकरू हे पाकमधून आले आहेत काय ? : पुरोहित 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई : मुंबईकर जुने भाडेकरू हे पाकिस्तानमधून आले आहेत काय ? ते ही या देशाचे नागरिक आहेत. त्यासाठी जुन्या इमारती दुरूस्तीसाठी एक हजार कोटी रूपये म्हाडाला द्यावे तसेच जुन्या इमारती ताब्यात घेवून आंतरराष्ट्रीयस्तरावर निविदा मागवून त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी आज केली. 

मंत्रालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुरोहित म्हणाले, "" घर मालक छोट्या छोट्या गोष्टीसाठी कोर्टात जातात. त्यांच्याकडे पैसा असतो ते मोठे वकील करतात. आजकाल कोर्टाच्या वकिलांची फी वाढली आहे. त्यामुळे मुंबईतील लाखो भाडेकरू पैश्‍याअभावी कोर्टातही जावू शकत नाहीत. त्यामुळेच मी ही मागणी सरकारकडे केली आहे. 

" मुंबई अनेक ठिकाणी घरमालकांच्या आडमुठेपणामुळे आणि असहकारामुळे इमारतीमधील रहीवाशांना इच्छा असूनही पुर्नविकासाशिवाय वंचित रहावे लागते. अशा इमारतींचा सरकारने पुर्नविकास करावा. झोपडपट्टीवासीयांना 500 चौरस फुटांचे घर मिळण्यासाठी उपाय योजना करा. घरमालकांमुळे त्रस्त असलेल्या भाडेकरूनी अशा इमारतींची थेट मालकी द्यावी. या संदर्भात अध्यादेश काढून घरमालकांचा अधिकार संपुष्टात आणावा आणि भाडेकरूंना त्यांचा मालकी हक्क द्यावा अशी मागणी पुरोहित यांनी यावेळी केली.  

संबंधित लेख