mumbai-uttam-khobragade-gautam-sonawane | Sarkarnama

उत्तम खोब्रागडेंकडून आंबेडकरी चळवळीचा विश्वासघात : गौतम सोनवणे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आंबेडकरी चळवळीचा विश्वासघात केला आहे. त्यांचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी केला आहे. 

मुंबई : सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आंबेडकरी चळवळीचा विश्वासघात केला आहे. त्यांचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी केला आहे. 

उत्तम खोब्रागडेंच्या घरावर उद्या रविवार दि 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता वर्सोवा येथे रिपाइंच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे रिपाईंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे सांगितले. 

उत्तम खोब्रागडे यांना रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, त्यांनी रिपाईंला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

खोब्रागडे यांनी कारकिर्दीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संरक्षणासाठी रिपाइंचा वापर केला. आता रिपाइंचा विश्वासघात करून ते काँग्रेस मध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरावर रिपाइंतर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी सांगितले.
 

संबंधित लेख