mumbai university news | Sarkarnama

मुंबई विद्यापीठाविरोधात उद्या राष्ट्रवादीचे उपोषण 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अनागोदी कारभाराला जबाबदार असलेल्या कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर कारवाई केली जात नाही, तर अजूनही असंख्य विद्यार्थ्यांना परीक्षांच्या निकाल आणि त्यानंतरच्या प्रवेशाचा फटका बसला असल्याने उद्या (मंगळवारी) राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात उपोषण करणार आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थांचे निकाल दिरंगाई ही विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासाला साजेशी नाही. यामुळे परदेशी तसेच देशांतर्गत असणाऱ्या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेस पूर्ण करण्यासाठी लाखो विद्यार्थांचे नुकसान झालेले आहे. 

निकाल जाहीर झाल्यावर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांची गुणपत्रिका देणे बंधनकारक असतानाही ती दिली जात नाही, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्‍यात आलेले आहे, तर दुसरीकडे हेल्पडेस्कच्या नावाखाली विद्यार्थ्यांना हेलफाटे घालावे लागत आहे बारकोड आदींच्या तांत्रिक बाबीमध्ये विद्यार्थांना अडकवून विद्यार्थांना तासनतास पिळवणूक केली जात असून ते विद्यापीठाने तात्काळ थांबवावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी केली आहे. 

त्यासोबतच ऑन प्रक्रीयेमधील मेरिट्रॅक या कंपनीवर आणि तिच्या व्यवहारात सामील असलेल्यावर कारवाई करावी, 
पुर्नमुल्यांकन आणि फोटो कॉपीसाठी वाढणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का लक्षात घेता ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी मोफत करावी, पाच दिवसात पुर्नमुल्यांकन आणि फोटो कॉपी दोन दिवसात मिळावी जेणेकरून विद्यार्थांचे वर्ष वाया जाणार नाही. 

पुर्नमुल्यांकन आणि फोटो कॉपी साठी मुदत वाढ द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत. या उपोषणातराष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत इतर सेलचे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.

संबंधित लेख