Mumbai still as it is after Thirteen Years | Sarkarnama

26 जुलै - 13 वर्षांनंतरही मुंबईकर आहे तिथेच

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

गेल्या पंधरवड्यात मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले. रेल्वे रुळावर पाणी भरले. मुंबई जलमय झाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली. मुंबईचा बोजवारा उडाला. दरवर्षी मुंबईकरांना पुराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना दिलासा मिळालेला नाही.

मुंबई - मुंबईत 26 जुलै 2005 रोजी आलेल्या महापुराला 13 वर्षे झाली. तसा प्रलय पुन्हा होवू नये यासाठी पालिकेने 'ब्रिमस्टोवॅड' प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत या प्रकल्पावर 3200 कोटी रुपये पालिकेने खर्च केले. मात्र, मुसळधार पाऊस सुरू झाला की मुंबईकरांना धडकी भरते. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई जलमय होते. मुंबईकरांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. 

गेल्या पंधरवड्यात मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले. रेल्वे रुळावर पाणी भरले. मुंबई जलमय झाली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली. मुंबईचा बोजवारा उडाला. दरवर्षी मुंबईकरांना पुराच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना दिलासा मिळालेला नाही. या संकटावर मात करण्यासाठी पालिकेने 1989 साली ब्रिमस्टोवॅड प्रकल्प पालिकेने हाती घेतला होता. हा प्रकल्प मधल्या काळात रेंगाळला होता. मात्र 26 जुलैच्या महापुराने पालिकेला या प्रकल्पाची पुन्हा जाग आली.

या प्रलयाला मिठी नदी कारण ठरली होती. या महापुरानंतर ब्रिमस्टोवॅड या प्रकल्पाची पालिकेला नव्याने जाग आली. हा प्रकल्प पुनरूज्जीवित झाला. तब्बल 3200 कोटी रुपये या प्रकल्पावर पालिकेने खर्च केला आहे. एवढे करूनही हिंदमातासह मुंबईचा सखल भाग जलमय होत आहे. 

हाजी अली, ईर्ला, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया आऊटफॉल या पाच पंगिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली आहे. अजून दोन पंपिंग स्टेशनची कामे बाकी आहे. मात्र मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी भरत आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पामुळे मुंबईतील नाल्यांची क्षमता वाढली. मुंबईत पडणाऱ्या ताशी 50 मिलीमीटर इतक्‍या पावसाला वाहून नेण्याची क्षमता सद्या नाल्यांमध्ये आहे. त्यापेक्षा अधिक पाऊस झाल्यास मुंबई तुंबते. या संकटावर अजूनही पालिकेला मात करता आलेली नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

26 जुलैच्या महापुराला 13 वर्षे झाली. अजूूनही सुधारणा नाही. सत्ताधारी शिवसेना भाजप आणि पालिका प्रशासन याला जबाबदार आहे. 

संबंधित लेख