Mumbai Shivsena in a Fix About Narayan Rane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

राणेंच करायचं काय? सैनिकांसमोर यक्ष प्रश्न

ब्रह्मा चट्टे
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

सत्तेत असूनही सतत विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेवर मित्र पक्ष भाजपने 'नारायणअस्त्र' उगारले आहे. एकेकाळचे कट्टरशिवसैनिक असणाऱ्या नारायण राणे यांना 'एनडीए' मध्ये घेत भाजपने शिवसेनेची पुरती कोंडी केली आहे. त्यामुळे राणे सेनेवर 'प्रहार' केल्यास त्याचा 'सामना' कसा करायचा याची खलबते सेनाभवना चांगलीच रंगत आहेत. यामुळे नारायण राणेंचे आता करायचे काय? असा यक्षप्रश्न शिवसैनिकांना पडला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मुंबई : सत्तेत असूनही सतत विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेवर मित्र पक्ष भाजपने 'नारायणअस्त्र' उगारले आहे. एकेकाळचे कट्टरशिवसैनिक असणाऱ्या नारायण राणे यांना 'एनडीए' मध्ये घेत भाजपने शिवसेनेची पुरती कोंडी केली आहे. त्यामुळे राणे सेनेवर 'प्रहार' केल्यास त्याचा 'सामना' कसा करायचा याची खलबते सेनाभवना चांगलीच रंगत आहेत. यामुळे नारायण राणेंचे आता करायचे काय? असा यक्षप्रश्न शिवसैनिकांना पडला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा विरोध डावलून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला 'एनडीए' मध्ये प्रवेश दिला आहे. त्याचबरोबर राणे लवकरच मंत्री मंडळातही प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे कट्टर हाडवैर असलेल्या नारायण राणे सोबत शिवसेनेचे आमदार मांडीला मांडी लावून कसे बसणार?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहेत.

भाजपवर टीका केल्यानंतर प्रत्युत्तर देण्याचे भाजपचे नेते टाळत होते. मात्र आता नारायण राणे यांचा शिवसेना विरोध लक्षात घेता मंत्रीमंडळाच्या बैठकीतच खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी मंत्रीपद दिल्यावर शिवसेना मंत्र्यांची भूमिका काय रहाणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. नारायण राणे यांना मंत्री मंडळात घेतल्यानंतर शिवसेनेचे मंत्री मंत्रीमंडळातून बाहेर पडणार नसल्याचे ठरवण्यात आले असले, तरी नारायण राणेंचं करायच काय असा यक्षप्रश्न सैनिकांना सतावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित लेख