mumbai-ram kadam sachin sawant | Sarkarnama

`मुख्यमंत्र्यांवरील आरोप म्हणजे नखे कापून शहीद भासवण्याचा प्रयत्न`

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 मार्च 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रिव्हर मार्चच्या चित्रफितीवरून दररोज एक नवीन प्रसिद्धीपत्र काढण्याचा सचिन सावंत यांचा प्रयत्न हा निव्वळ पोरकटपणा आहे. अशा पोरकटपणासाठी कुणीच कुणाला जेलमध्ये टाकत नाही. पण यातून नखं कापून स्वतःला शहीद भासवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. राजकीय विजनवासात असल्यानेच सावंत यांचा हा प्रयत्न सुरू असल्याची टीका भाजपा प्रवक्ते आमदार राम कदम यांनी केली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रिव्हर मार्चच्या चित्रफितीवरून दररोज एक नवीन प्रसिद्धीपत्र काढण्याचा सचिन सावंत यांचा प्रयत्न हा निव्वळ पोरकटपणा आहे. अशा पोरकटपणासाठी कुणीच कुणाला जेलमध्ये टाकत नाही. पण यातून नखं कापून स्वतःला शहीद भासवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. राजकीय विजनवासात असल्यानेच सावंत यांचा हा प्रयत्न सुरू असल्याची टीका भाजपा प्रवक्ते आमदार राम कदम यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना संपूर्णपणे अधिकार असतानाही त्यांना प्रश्न विचारताना, सचिन सावंतांना याचा सोयीस्कर विसर पडतो की, विरोधी पक्ष नेते उपस्थित नसताना काँग्रेस पक्षाच्या सर्व बैठका अधिकृत शासकीय निवासस्थानी घेतल्या जातात. मुख्यमंत्र्यांनी सविस्तर खुलासा करून आणि महाराष्ट्रातील जनतेला ते स्पष्ट होऊनही केवळ वैफल्यातून, नैराश्यातून आणि पराभूत मानसिकतेतून असे आरोप पुन्हा केले जात आहेत.

मुख्यमंत्री कार्यालय तसेच मी स्वत: सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील कलम-6 नुसार शहराचा नागरिक म्हणून अधिकाऱ्यांना सामाजिक कार्यासाठी पूर्वपरवानगीची अजिबात गरज नाही. निव्वळ सवंग प्रसिद्धीच्या हव्यासातून  सचिन सावंत यांचा हा अट्टाहास सुरु आहे. म्हणूनच त्यांच्या या पोरकटपणाला कोणतेही उत्तर देण्याची गरज आता मला वाटत नाही, असेही राम कदम यांनी या निवेदनात म्हटले आहे.
  
 

संबंधित लेख