Mumbai Potholes Political Parties Agitations | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

खड्ड्यांनी केले राजकीय पक्षांना जागे : आंदोलनांची चढाओढ 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 23 जुलै 2018

मुंबईतील्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. प्रशासनाने अद्याप खड्डे भरले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. त्याचा फायदा घेत खड्ड्यांवरून आता मुंबईत राजकारण तापू लागले आहे.

मुंबई : मुंबईतील्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. प्रशासनाने अद्याप खड्डे भरले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. त्याचा फायदा घेत खड्ड्यांवरून आता मुंबईत राजकारण तापू लागले आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर थंडावलेल्या राजकीय पक्षांना खड्ड्यांनी जागे केले आहे. खड्ड्यांविरोधात जनमत तयार करण्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांची खड्ड्याच्या मुद्‌द्‌यावार आंदोलनाची चढाओढ सुरू आहे. 

काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांच्या विषयावर पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलने झाली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही खड्ड्यांना पालिका आयुक्तांसह रस्ते पालिकेच्या अधिकाऱ्यांची नावे देण्याचे आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी साकीनाका येथील रस्त्यावरील खड्ड्यांत उतरून आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

मनसेने गतवर्षी खड्ड्यांचा विषय चांगलाच लावून धरला होता. पालिकेच्या मुख्य रस्ते अभियंत्यांना दादरमधील एका रस्त्यातील खड्ड्यांत उभे केले होते. अधिकाऱ्याच्या गळ्यात खड्ड्यांना जबाबदार असल्याची पाटी लटकविली होती. यंदा सर्वच राजकीय पक्षांनी खड्ड्यांचा विषय लावून धरला आहे. मनसेने खड्डे भरण्यात असमर्थ ठरलेल्या पालिका प्रशासनाविरोधात आज घाटकोपर येथे आंदोलन केले. खड्ड्यांमुळे प्रशासनाविरोधात राजकीय लढाया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वातावरण तापवून त्याचे राजकीय श्रेय घेण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न सुरु आहे. 

खड्ड्यांना श्रद्धांजली 
साकीनाका मेट्रो स्थानकाजवळच्या परिसरात पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी मनसेने आंदोलन करून प्रशासनाने न केलेल्या कामाला दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. आठ दिवसांत मेट्रो पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

संबंधित लेख