महाराष्ट्राची सत्ता टिकेल! काश्मीर टिकेल काय? : उद्धव ठाकरे 

अमित शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत व आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. अर्थात मध्यावधीचे काय होणार यापेक्षा आम्हाला चिंता आहे ती काश्मीरचे काय होणार ? हिंसेच्या वणव्यात जळत असलेल्या दार्जिलिंगचे काय होणार ? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील अग्रलेखात विचारला आहे. " महाराष्ट्राची सत्ता टिकेल ! काश्मीर टिकेल काय ?" या मथळ्याखाली 'सामना'मधून लिहलेल्या अग्रलेखातून संघ परिवारसह भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत.
महाराष्ट्राची सत्ता टिकेल! काश्मीर टिकेल काय? : उद्धव ठाकरे 

मुंबई :अमित शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत व आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. अर्थात मध्यावधीचे काय होणार यापेक्षा आम्हाला चिंता आहे ती काश्मीरचे काय होणार ? हिंसेच्या वणव्यात जळत असलेल्या दार्जिलिंगचे काय होणार ? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील अग्रलेखात विचारला आहे. " महाराष्ट्राची सत्ता टिकेल ! काश्मीर टिकेल काय ?" या मथळ्याखाली 'सामना'मधून लिहलेल्या अग्रलेखातून संघ परिवारसह भाजपला चांगलेच चिमटे काढले आहेत.

उद्धव ठाकरे अग्रलेखात म्हणतात, "पोलीस व जवान यांच्या हौतात्म्यांचे आकडे मोजायचे तरी किती, हा प्रश्न आमच्यापुढे आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील सरकारचे काय होणार, हा प्रश्न काहींना महत्त्वाचा वाटत आहे. महाराष्ट्रातील सरकारचा टेकू काढून घेतला तर पाठिंब्यासाठी पाच-पंधरा डोकी विकत घेऊन सरकार टिकविण्याची धडपड समजण्यासारखी आहे. फडणवीस यांचे सरकार पाच वर्षांसाठी टिकेलच टिकेल अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली आहे, पण देशाच्या नकाशावर काश्मीर टिकेल काय ? 

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा उल्लेख करत ठाकरे म्हणातात, "महाराष्ट्रात शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरकस भूमिका घेते. राष्ट्रीय प्रश्नांवर स्वतंत्र व देशाच्या स्वाभिमानाचे मत मांडते म्हणून शिवसेनेस धडा शिकविण्याचे डावपेच आखले जातात, पण काश्मीरात ''अराष्ट्रीय'' भूमिका घेणाऱ्यांच्या पाठीशी भाजप समर्थपणे उभी आहे. मेहबुबांच्या बेलगाम अराष्ट्रीय वक्तव्यांवर 'ब्र' काढण्याची हिंमत परिवारातील लोक दाखवत नाहीत. काश्मीर टिकायला हवं. महाराष्ट्राचे सरकार हे प्राधान्य असता कामा नये. आश्वासनांच्या टोप्या लावून व या बोटावरील थुंकी त्या बोटावर करून ते टिकवले जाईलही, पण काश्मीर कसे टिकविणार आहात ? असा चिमटाही ठाकरे यांनी भाजपला काढला आहे.

देशातील अशांत परिस्थीतीकडे लक्ष वेधताना उद्धव ठाकरे लिहतात, " काश्मीर व दार्जिलिंग येथे हिंसाचार भडकला आहे. काश्मीरात अतिरेक्यांचा उच्छाद आहे तर दार्जिलिंग येथे स्वतंत्र ‘गोरखालॅण्ड’साठी हिंसक आंदोलन सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दार्जिलिंग येथे पोलिसांबरोबर निरपराध्यांचे बळी गेले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवूनही ते ऐकायला तयार नाहीत. आंदोलकांकडे सर्व प्रकारची हत्यारे आहेत. ईशान्येकडील उग्रवाद्यांकडून दार्जिलिंगमधील आंदोलकांना पाठबळ मिळत आहे व हा प्रकार गंभीर आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण दार्जिलिंगच्या पेटलेल्या होळीवर कोणी राजकीय पोळी भाजू नये इतकीच आमची अपेक्षा असल्याचेही ठाकरे नमूद करतात. ते पुढे लिहतात, " महाराष्ट्रातील मध्यावधीचे काय व्हायचे ते होईल, अमित शहा म्हणतात त्याप्रमाणे मध्यावधीनंतर त्यांचेच सरकार येईल. त्यांना हवा तो राष्ट्रपती होईल. प्रत्येक निवडणुका तुम्ही जिंकाल व टिकाल, पण काश्मीरची लढाई जिंकणार काय? जवानांचे प्राण वाचतील काय? काश्मीर देशाच्या नकाशावर जवानांच्या बलिदानाशिवाय टिकेल काय? याचे उत्तर देशाला हवे आहे ! "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com