Mumbai politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

भाजपमधल्या 'इनकमिंग'वरून अर्थमंत्री व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी 

ब्रह्मा चट्टे 
सोमवार, 22 मे 2017

भाजपमधल्या 'इनकमिंग'वरून अर्थमंत्री व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विधानसभेत आज खडाजंगी झाली. "जीएसटी लागू केल्याने आता विरोधकांचे बुरे दिन येणार आहेत. पृथ्वीराजबाबा मला माहितीय तुम्ही कट्टर कॉंग्रेसी विचारांचे आहात. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही भाजपमध्ये येणार नाहीत,' असा चिमटा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना काढला. ते विधानसभेत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम ( जीएसटी ) बिलावर निवेदन करत होते. 

मुंबई : भाजपमधल्या 'इनकमिंग'वरून अर्थमंत्री व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विधानसभेत आज खडाजंगी झाली. "जीएसटी लागू केल्याने आता विरोधकांचे बुरे दिन येणार आहेत. पृथ्वीराजबाबा मला माहितीय तुम्ही कट्टर कॉंग्रेसी विचारांचे आहात. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही भाजपमध्ये येणार नाहीत,' असा चिमटा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना काढला. ते विधानसभेत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम ( जीएसटी ) बिलावर निवेदन करत होते. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "गोरगरिबांच्या हितासाठी आम्ही जीएसटी लागू करत आहोत. विरोधकांच्या काळात राज्याचे उत्पन्न घटले. आता आम्ही जीएसटी लागू केल्याने राज्याचे उत्पन्न 2 टक्‍क्‍याने वाढणार आहे. राज्यातील सामान्य नागरिकांच्या, गरिबांच्या आदिवासींच्या जीवनात यामुळे बदल घडून येणार आहे. देशाचा सध्याचा विकासदरही वाढणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देशातील "कर दहशतवाद' संपणार आहे. त्यामुळे आता विरोधकांचे बुरे दिन येणार आहेत.'' 

या वेळी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना उद्देशून मुनगंटीवार म्हणाले, "जयंतराव तुम्ही रामप्रसाद बोर्डीकरांना भाजपात का घेतलं ? असा प्रश्न काल विचारला होता. पण तुमचा खरा प्रश्न हा त्यांनाच का घेतलं; मला (जयंत पाटील) का नाही घेतलं हा होता.'' या वाक्‍यावर हरकत घेत जयंत पाटील उभे राहिले होते. मात्र, अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे वळसे-पाटील हरकत घेत म्हणाले, ""किती जणांना घेणार आहात ? जागा तरी आहे का तुमच्याकडे ? प्रत्येक वेळेस मंत्री म्हणूनही भाषा शोभत नाही.'' 

संबंधित लेख