Mumbai Politics | Sarkarnama

बाहुबलीचा पार्ट टू दाखवायला तयार : मुख्यमंत्री 

ब्रह्मा चट्टे 
सोमवार, 22 मे 2017

मुंबई : माझ्याकडे चिट्टी आली आहे, की कट्टाप्पाने बाहुबली को क्‍यू मारा, याचे उत्तर मिळाले नाही. तुम्ही म्हणाला तर मी बाहुबली पार्ट टू दाखवायला तयार असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. आज विधानसभेत एकमताने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम (जीएसटी) मंजूर करण्यात आला. त्यावेळी अभिनंदन करतेवेळी मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत आपण तीन दिवस संपूर्ण चर्चा करून एकमताने विधानसभेत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम ( जीएसटी )विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे राज्याच्या इतिहासातील आज ऐतिहासिक दिवस आहे. त्यामुळे मी सर्वांचे अभिनंदन करतो. आपण सगळे या इतिहासाचे साक्षीदार आहात." मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते, सर्व पक्षाचे गटनेते विधानसभेच्या सर्व सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. 

दरम्यान, जीएसटी बिलाच्या चर्चेवेळी विधानसभेत बाहुबली या चित्रपटावरून विरोधी व सत्ताधारी बाकावरून एकमेकांना बरेच टोले लगावले गेले. यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये साधकबाधक चर्चा करत जीएसटी बील मंजूर करण्यात आले. 

संबंधित लेख