mumbai politics | Sarkarnama

मेट्रोने आणले राष्ट्रवादीचे कार्यालय उघड्यावर 

संजीव भागवत 
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मुंबई : मेट्रोच्या कामासाठी सहकार्याची भावना ठेवून मंत्रालयाच्या शेजारी आपले कार्यालय इतरत्र हलविण्यासाठी तयार झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाची मेट्रो प्रशासनाने मोठी अडचण केली आहे. 

बेलॉर्ड पिअर येथील कार्यालय अद्यापही तयार करण्यात आले नसून, मंत्रालयाशेजारील कार्यालय बंद केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यालय उघड्यावर आले आहे. प्रत्येक दिवशी राज्यभरातून येणारे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांनी कोठे बसायचे असा गंभीर प्रश्‍न राष्ट्रवादीसमोर निर्माण झाला असून यासंदर्भात सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. 

मंत्रालयाशेजारी असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे शनिवारपासून पाणी आणि वीज बंद करण्यात आलेले असले तरी बेलॉर्ड पिअर येथील कार्यालय अद्यापही तयार करण्यात आलेले नाही. सर्व ठिकाणी कार्यालयाच्या तयारीसाठी आणलेल्या वस्तू पडून आहेत. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे कार्यालयाचा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला पर्यायी कार्यालय नसल्याने त्यांचे मुंबईतील कामकाज मोठया प्रमाणात ठप्प पडण्याची शक्‍यता असून कामकाजासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची यामुळे मोठी तारांबळ उडणार आहे. 

विकासाला चालना मिळावी म्हणून मेट्रोच्या स्थानकासाठी कोणत्याही प्रकारचा विरोध करू नये, ही भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसची होती. त्यासाठी झालेल्या मेट्रोसाठी झालेल्या बैठकांमध्ये आमचे कार्यालय बेलॉर्ड पिअर येथे हलविण्यासाठी आमची तयारी झाली. आमच्या या कार्यालयाकडे असलेली साडेनऊ हजार चौरस फुटांची जागा आम्ही सोडून देण्यास तयार झालो. त्या बदल्यात आम्हाला बेलॉर्ड पिअर येथील ठाकरसी इमारतीत पहिल्या आणि खालचा मजल्यावर प्रत्येकी 400 फुटाची जागा देण्यात आली. त्यावरही आम्ही नाराजी व्यक्‍त न करता तयारी दर्शवली. पुढे या जागेवर आमचे कार्यालय कसे असावे यासाठी आम्ही प्लॅनही दिला. त्या प्लॅनप्रमाणे आम्हाला कार्यालय तयार करून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते, मात्र अद्यापही येथे साधे टेबलखुर्चीही टाकण्याचे काम झाले नसल्याने आमच्यापुढे मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. 

विकासासाठी आम्ही सर्व त्याग केलेला असतानाही आमची अडचण करणाऱ्या सरकारला आता जाब विचारावा लागेल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिला. 

संबंधित लेख