भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी रस्त्यावर उतरण्याचा भाजपचा इशारा 

मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर असला तरी, राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून भाजपच्या 82 नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपने मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला अप्रत्यक्ष दिला आहे.
भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी रस्त्यावर उतरण्याचा भाजपचा इशारा 

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर असला तरी, राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून भाजपच्या 82 नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला आहे. भ्रष्टाचारविरहित पारदर्शक कारभार व्हावा यासाठी भाजपचे नगरसेवक पहारेकऱ्याचे काम करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजपने मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला अप्रत्यक्ष दिला आहे. 

देशात जीएसटी लागू केल्यानंतर मुंबई महापालिकेने तत्काळ जकात हटवावी, अशी मागणीही मुंबई भाजपच्या कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेना आणि भाजपचे संख्याबळ जवळपास सारखे असताना मुंबईत शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा करत, शिवसेनेशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला होता. 

मुंबई भाजपने पक्ष विस्तारावर भर देताना, प्रसंगी शिवसेनेशी संघर्ष करण्याची मानसिकता तयार केल्याचे दिसून आले आहे. मुंबई महापालिकेतील पारदर्शी कारभाराबाबत आम्ही ठाम असून ,भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी दिली. 

सायन येथील मानव सेवा संघात भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री व्ही. सतीश यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीला गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह मुंबईतील सर्व भाजप आमदार, नगरसेवक ,पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मुंबई महापालिकेत भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेय देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. 

देशात वस्तू व सेवा कर कायदा (जीएसटी)लागू होत असून राज्याने त्याला सहमती दिल्यानंतर तत्काळ मुंबई महापालिकेने जकात हटवावा. मुंबई महापालिकेचा नवीन विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर महापालिका अधिनियम 1888 कलम (61) नुसार त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक व्हावे. मुंबईत पाण्याचे समान वाटप करताना 24 तास पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. मुंबई महापालिकेचा ताळेबंद सुटसुटीत पद्धतीने तयार करून तो जनतेसाठी खुला करावा. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात यावे. मुंबई महापालिकेतील सार्वजनिक ठिकाणी एलईडी दिव्याचा वापर सक्तीने करावा. बेस्ट परिवहन सेवा चांगली व्हावी यासाठी महापालिका अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूद करावी, मुंबईत पर्यावरणाच्या दृष्टीने मोकळ्या जागा व झाडे यांची विशेष काळजी घ्यावी, असे ठराव भाजप कार्यकारणीच्या बैठकीत मांडण्यात आले. 

येत्या 15 मेनंतर मुंबईतील सर्व नाल्याच्या सफाईची पाहणी भाजपच्या सर्व नगरसेवकांसह मुंबई अध्यक्ष आशिष शेलार करणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com