आम्ही चोर आहोत, तुमच्या वाढदिवसाला आमची उपस्थिती कशाला : उदयनराजेंना शिवेंद्रराजेंनी केला सवाल

आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा विधानसभा मतदारसंघात अडचण होण्याची भिती लक्षात घेऊन आज खासदार उदयनराजेंनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले तेही मोबाईलवरून. पण आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांचे निमंत्रण मान्य केले नसल्याचे संपर्क सुत्रांनी सांगितले.
आम्ही चोर आहोत, तुमच्या वाढदिवसाला आमची उपस्थिती कशाला : उदयनराजेंना शिवेंद्रराजेंनी केला सवाल

सातारा : आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा विधानसभा मतदारसंघात अडचण होण्याची भिती लक्षात घेऊन आज खासदार उदयनराजेंनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंना आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले तेही मोबाईलवरून. पण आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांचे निमंत्रण मान्य केले नसल्याचे संपर्क सुत्रांनी सांगितले. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या 24 फेब्रुवारीला होणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात देश व राज्यपातळीवरील मान्यवर मंडळींना निमंत्रण आहे. पण यातील नेमके कोण कोण उपस्थित राहणार याची राजकीय वर्तूळात उत्सुकता आहे. पण सर्वांपेक्षा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे नाव पत्रिकेत टाकलेले असले तरी त्यांना प्रत्यक्ष निमंत्रण कालपर्यंत मिळालेले नव्हते. पण आगामी लोकसभा निवडणुक लक्षात घेता या कार्यक्रमाला शिवेंद्रसिंहराजेंची उपस्थिती खासदार उदयनराजेंना महत्वपूर्ण वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी आज आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी मोबाईलवरून संपर्क केल्याचे संपर्क सुत्रांनी सांगितले. 

सुरवातीला शिवेंद्रसिंहराजेंनी फोन उचलला नाही. शेवटी त्यांनी त्यांनी फोन उचलला. त्यावेळी उदयनराजेंनी त्यांना तुम्ही आमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हवे आहात. मागे झालेल्या प्रकरणांबद्दल मी माफी मागतो. पण कार्यक्रमाला या...सॉरी आय लव्ह यू...असे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी दिले. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी 'आम्ही चोर आहोत, आमच्या सारख्यामुळे तुमचा कार्यक्रम खराब होईल. कशाला आम्हाला बोलवता,' असा प्रश्‍न केला. मात्र, 'तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला निरोगी उदंड आयुष्य लाभो,' अशा शुभेच्छा दिल्या. यावर उदयनराजेंनी झाले गेले विसरून जाऊन तुम्ही कार्यक्रमाला या, असे सांगितले तरीही शिवेंद्रसिंहराजेंनी होकार दिला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com