मनसेचे नितीन नांदगावकर यांना दोन वर्षे तडीपारीची नोटीस

मनसेचे नितीन नांदगावकर यांना दोन वर्षे तडीपारीची नोटीस

मुंबई : मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांना दोन वर्षे तडीपारची नोटीस काल बजावली. पासपोर्ट घोटाळा, ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी नांदगावकर यांनी उघड केली होती. त्यासाठी कायदा हातात घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  

पासपोर्ट घोटाळ्यामुळे अनेकांची फसवणूक उघड केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नांदगावकर यांची तडीपारी करण्याच्या हातलाचील सुरू झाल्याने मनसेने या कारवाईला विरोध सुरू केला आहे.

या नोटिसीला उत्तर देताना संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया नांदगावकर यांनी दिली आहे. माझी भीती नेमकी कोणाला वाटतेय? सर्वसामान्य नागरिकांना माझी भीती वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुबंई पोलीस कामाला लागले आहेत. महाराष्ट्र माझा आहे. कुठे कुठे मला तडीपार करणार? जनतेने सांगावे मी कुठे चुकतोय? मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणार, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com