शिवसेनेवर आरोप करणारे गोट्या खेळत कोठे बसले आहेत ? - उद्धव ठाकरे 

सरकारविरुद्धचा हा संताप आणि भाजपास सत्तेवर आणल्याबद्दलचा हा पश्चात्ताप असेल तर मुख्यमंत्र्यांनी ही धोक्याची घंटा वेळीच ओळखायला हवी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेवर भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीचे आरोप करणारे आता कोठे गोट्या खेळत बसले आहेत ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. " पोलिसांनी तुमची भांडी घासायची काय ? " या मथळ्याखाली सामनात लिहलेल्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
शिवसेनेवर आरोप करणारे गोट्या खेळत कोठे बसले आहेत ? - उद्धव ठाकरे 

मुंबई : सरकारविरुद्धचा हा संताप आणि भाजपास सत्तेवर आणल्याबद्दलचा हा पश्चात्ताप असेल तर मुख्यमंत्र्यांनी ही धोक्याची घंटा वेळीच ओळखायला हवी. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेवर भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीचे आरोप करणारे आता कोठे गोट्या खेळत बसले आहेत ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. " पोलिसांनी तुमची भांडी घासायची काय ? " या मथळ्याखाली सामनात लिहलेल्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. 

उद्धव ठाकरे लिहतात, " सत्ता डोक्यात गेली की जमिनीवरचे पायही खांद्यावर घेऊन काही लोक चालू लागतात. पण हे चालणे नसते, तर हवेतील तात्पुरते तरंगणे असते. सत्ताधारी भाजप पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक मंडळी सध्या ज्या बेगुमान पद्धतीने वागत आहेत ते पक्षाच्या संस्कृतीला व परंपरेला शोभणारे नाही. विदर्भातील एक भाजप आमदार राजूभाई तोडसम यांनी एका ठेकेदारास धमक्या - शिव्या देऊन वीसेक लाखांची खंडणी मागितल्याचा ‘व्हिडीओ’ सध्या गाजतो आहे. पुन्हा हे आमदार महाशय सरळ सरळ राज्याचे सरळमार्गी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे नाव घेतात. जणू काही या खंडणीतला वाटा मुख्यमंत्री कार्यालयालाच पोहोचणार होता. पण या आमदार महाशयांवर कायद्याने काय कारवाई झाली ? असा सवालही ठाकरे विचारतात.

ते पुढे लिहतात, "भाजपात निवडणुका जिंकण्यासाठी जे ‘वाल्या’ मंडळ घेतले त्यांच्या चारित्र्याची ही फसफस आहे. मुंबईतील एक भाजप आमदार अमित साटम फेरीवाल्यांच्या प्रश्नांवरून पोलिसांना आई-बहिणीवरून शिव्या देताना एका ‘व्हिडीओ’मध्ये दिसत आहे. परिवर्तन म्हणायचे ते हेच काय ? पोलिसांना फक्त भरचौकात नागडे करून मारायचेच काय ते कमी ठेवले आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांना नेहमी असेच वाटत आले आहे की, पोलीस व सरकारी यंत्रणा ही त्यांची गुलाम आहे. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांचे बेइमान आदेश पाळायलाच हवेत. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या घरची भांडी घासावीत असेही त्यांना वाटते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी महत्त्वाची ठरते. पण तेथेही सब घोडे बारा टकेच आहे. उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील तमाम पोलीस वर्गाने भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सहभागी व्हावे, असा एखादा फतवा निघाला तरी आश्चर्य वाटू नये, असा चिमटाही ठाकरे यांनी सरकारला काढला आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, "सत्ता टिकवण्यासाठी व पक्षाच्या विजयासाठी ‘वाल्या’ मंडळास डोक्यावर घेऊन नाचायचे व त्याच वाल्या मंडळाने बेफाम होऊन पोलिसांचे धिंडवडे काढायचे हे लक्षण महाराष्ट्राला खड्ड्यात घालणारे आहे. हवेतून मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाते तेव्हा भल्याभल्यांचे पाय जमिनीवर राहत नाहीत. येथे भले कोण ? सगळेच ‘वाल्या’ आहेत. या वाल्यांपासून महाराष्ट्र वाचवा. शेतकरी संपावर गेले तसे पोलीसही सरकारी वाल्यांच्या विरोधात संपावर जातील, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com