Mumbai news - Udhav Thakeray | Sarkarnama

‘बनावटगिरी’ सुरू असेल तर मग बदलले काय ? - उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

आधार कार्डांची बायोमेट्रिक पडताळणी केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच वेळी बनावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. दैनंदिन जीवनात अनिवार्य केला जाणारा ‘आधार’ही बनावट ठरणार असेल तर कसे व्हायचे? सर्वच क्षेत्रात याच पद्धतीने ‘बनावटगिरी’ सुरू असेल तर मग बदलले काय ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. " मग बदलले काय ? " या मथळ्याखाली सामानमध्ये लिहलेल्या अग्रलेखात नोटबंदीनंतरच्या बनवट नोटांचा दाखला देत बनावट आधार कार्डवरून सरकारवर टीका केली आहे.

मुंबई : आधार कार्डांची बायोमेट्रिक पडताळणी केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच वेळी बनावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. दैनंदिन जीवनात अनिवार्य केला जाणारा ‘आधार’ही बनावट ठरणार असेल तर कसे व्हायचे? सर्वच क्षेत्रात याच पद्धतीने ‘बनावटगिरी’ सुरू असेल तर मग बदलले काय ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. " मग बदलले काय ? " या मथळ्याखाली सामानमध्ये लिहलेल्या अग्रलेखात नोटबंदीनंतरच्या बनवट नोटांचा दाखला देत बनावट आधार कार्डवरून सरकारवर टीका केली आहे.

देशात सत्तांतर झाले तरीही परिस्थिती बदलली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी याद्वारे सुचित केले आहे. त्यामुळे ठाकरे यांचा रोख मोदी सरकारकडे असून यालेखात त्यांनी सरकारला चांगलेच चिमटे काढले आहेत. उद्धव ठाकरे लिहतात, "आधार कार्डवरून वादाचा धुरळा उडाला नाही असे होत नाही. आधार कार्डच्या सुरक्षिततेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आधार कार्डद्वारा व्यक्तिगत माहिती ‘लीक’ झाल्याचेही आरोप झाले. आता त्यात बनावट आधार कार्डांची भर पडली आहे. देशभरात सुमारे तीन लाख बोगस आधार कार्ड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे ज्या कंपनीकडे आधार कार्ड नोंदणीचे काम दिले होते त्याच कंपनीचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. मध्य प्रदेशातील या रॅकेटमुळे आधार कार्डची सुरक्षितता, त्याचे पिटले जाणारे ढोल, सरकारी, बिगरसरकारी कामांमध्ये त्याची केली जात असलेली अनिवार्यता या सर्वांवरच प्रश्नचिन्ह लावले आहे. आधार कार्डच्या सुरक्षेविषयी सरकारतर्फे केला जाणारा दावाही पुन्हा एकदा पोकळ ठरला असल्याचे ठाकरे नमूद करतात.

ते पुढे लिहतात, "याप्रकरणी १० जणांना अटक झाली असली तरी बनावट आधार कार्डांची वाळवी आतापासूनच लागली तर व्यक्तिगत आणि देशाची सुरक्षा पोखरून काढायला तिला वेळ लागणार नाही. पूर्वी अनेक गैरप्रकार बोगस रेशन कार्डद्वारा केले जात. बोगस आणि घुसखोरांना मतदान ओळखपत्रे बनविण्यासाठीही बोगस रेशन कार्डचा सर्रास वापर होत आला आहे. बोगस रेशन कार्डांची जागा बनावट आधार कार्डांनी घेतली असे आता म्हणायचे का ? असा प्रश्नही विचारत उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, " देशात बोगस नोटांचा सुळसुळाट झाला होता यासाठी ही नोटाबंदीची कुऱ्हाड चालवून या भ्रष्टाचाराचे कंबरडे मोडले असे सरकार सांगते. मात्र नोटाबंदीनंतर लगेच दोन हजारांच्या नवीन बनावट नोटा सापडल्याच होत्या. आता बनावट आधार कार्डांचा पर्दाफाश झाला असल्याचे ठाकरे स्पष्ट करतात.

संबंधित लेख