नगरच्या ‘रोहिंग्यां’ना राजकीय पाठबळ मिळू नये - उद्धव ठाकरे

रोहिंग्या मुसलमानांना निर्वासित म्हणून हिंदुस्थानात आश्रय द्यावा अशा राजकीय खटपटी-लटपटी येथील काही बेगडी निधर्मीवाद्यांनी केल्या. ‘मानवता’ वगैरे शब्दांचे बुडबुडे त्यांनी फोडले तरी पंतप्रधान मोदी अजिबात बधले नाहीत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी `सामना'तील अग्रलेखात केले आहे.
नगरच्या ‘रोहिंग्यां’ना राजकीय पाठबळ मिळू नये - उद्धव ठाकरे

मुंबई : रोहिंग्या मुसलमानांना निर्वासित म्हणून हिंदुस्थानात आश्रय द्यावा अशा राजकीय खटपटी-लटपटी येथील काही बेगडी निधर्मीवाद्यांनी केल्या. ‘मानवता’ वगैरे शब्दांचे बुडबुडे त्यांनी फोडले तरी पंतप्रधान मोदी अजिबात बधले नाहीत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी `सामना'तील अग्रलेखात केले आहे. 

ज्यांना जगाच्या नकाशावर म्यानमार कुठे आहे ते माहीत नाही असे लोक रोहिंग्यांसाठी छाती पिटतात. महाराष्ट्रात ही कीड वळवळू लागली असेल तर या हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवायला हवी. नगरच्या ‘रोहिंग्यां’ना राजकीय पाठबळ मिळू नये. कोणी देण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या रोहिंग्याप्रेमाचाही बंदोबस्त करावाच लागेल, असा सुचक इशारा ठाकरे यांनी दिला आहे. "महाराष्ट्रातील रोहिंगे" या मथळ्याखाली सामनात लिहलेल्या अग्रलेखात ठाकरे यांनी संभाव्य हिंदू मुस्लीम फुटाचा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे लिहतात, " जगभरात मुसलमानांवर कुठेही अन्याय वगैरे झाला की हिंदुस्थानातील मुसलमानांच्या अंगास खाज सुटते व ते ‘इस्लाम खतरे में’च्या नावाने उगाच खाजवू लागतात. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय-अत्याचार होत असल्याचे सांगत नगरमधील मुसलमानांनी रस्त्यावर येऊन शुक्रवारी आंदोलन केले व म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा जाळून निषेध केला. नगरमधील ज्या मुसलमानांनी हे उद्योग केले त्यांना म्यानमार म्हणजे मालेगाव किंवा मुंबईतील मालवणी वाटले काय? ज्यांनी रस्त्यावर उतरून हा निषेध वगैरे केला त्यांना म्यानमार कुठे आहे व तिथे काय चालले आहे, मुळात रोहिंग्या मुसलमानांची समस्या आहे तरी काय याबाबत काही माहिती आहे काय ? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थीत केला आहे. 

उद्धव ठाकरे पुढे सांगतात, " रोहिंगे मुसलमान हे पाकिस्तानच्या अझहर मसूद वगैरे दहशतवादी मंडळींचे फतवे मानतात व धार्मिक तेढ निर्माण करून फुटीरतेची बीजे रोवतात. त्यांना म्यानमारचा तुकडा पाडायचा आहे. अशा फुटीरतावाद्यांना दयामाया दाखवणे कोणत्याही देशाला परवडणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे बुलडोझर फिरताच पळापळ झाली व इतर देशांत त्यांची घुसखोरी झाली. या रोहिंग्यांच्या नावाने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचे म्होरके गळा काढीत आहेत हे कसले लक्षण समजायचे व अशा रोहिंग्यांसाठी नगरमधील मुसलमानांच्या एका गटाने निषेध करावा हेसुद्धा भयंकरच असल्याचे ठाकरे सांगतात.

उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, " प. बंगाल व आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांनी आधीच हैदोस घातला आहे. त्यात आता या म्यानमारी रोहिंग्यांची भर नको. मागे एकदा म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवरील कारवाईची छायाचित्रे ‘व्हायरल’ करून येथील मुसलमानांच्या खोपड्या भडकवून दंगा पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. मुंबईच्या आझाद मैदानातदेखील काही वर्षांपूर्वी धर्मांध मुस्लिमांनी दुसऱ्या देशातील वादावरूनच धुडगूस घातला होता. तेथील शहीद जवानांच्या अमर जवान ज्योतीची तोडफोड करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तेव्हा इतर देशांतील मुस्लिमांबाबतच्या वादग्रस्त घटनांवरून आमच्याकडे अशा ठिणग्या पडतच असताना सरकारने रोहिंग्यांच्या प्रश्नाबाबत अति सावधान राहणे गरजेचे आहे, असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com