mumbai news - Udhav Thakare | Sarkarnama

`वंदे मातरम'चा कायदाच करा : उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 ऑगस्ट 2017

स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन आल्यावर देशप्रेमाचं भरतं येतं. थयथयाट करायचा. हे सर्व थोतांड आहे. करायचा असेल तर वंदे मातरम बोलण सक्तीचं करण्याचा कायद्याच करा, असे आव्हान आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला दिले. गणेशोत्सवाच्या लोगोतून लोकमान्य टिळकांचा फोटो हटविणे हा करंटेपणा असल्याची बोचरी टिकाही त्यांनी भाजपवर केली. 

मुंबई : स्वतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन आल्यावर देशप्रेमाचं भरतं येतं. थयथयाट करायचा. हे सर्व थोतांड आहे. करायचा असेल तर वंदे मातरम बोलण सक्तीचं करण्याचा कायद्याच करा, असे आव्हान आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला दिले. गणेशोत्सवाच्या लोगोतून लोकमान्य टिळकांचा फोटो हटविणे हा करंटेपणा असल्याची बोचरी टिकाही त्यांनी भाजपवर केली. 

मार्मिक साप्ताहिकाच्या 57 वा वर्धापन दिन आज विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवरच हल्ला चढवला. महापालिका शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा वंदे मातरम बोलण्याचा भाजपने मांडलेला ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यावरुन त्यांनी भाजपवर तोफ डागली. `वंदे मातरम'वरुन देशभक्तीचे मोजमाप करता येणार नाही असे त्यांचेच मंत्री बोलतात. मग त्यांना बाहेर हकलायचे का, असा प्रश्‍न उपस्थीत करुन 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सर्वांना देशभक्ती आठवते. 16 ऑगस्टला सर्व विसरुन जातात. म्हणून वंदे मातरमचा कायदाच करायला हवा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले. 

पुणे महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या जाहिरातून लोकमान्य टिळकांचे छायाचित्र काढून टाकले. यावरुन पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका होत असताना उद्धव ठाकरे यांनी संधी साधली. टिळकांना हटविणे हा करंटेपणा आहे. हे धाडस करणारे आपलेच लोकं आहे. त्यांना लोकांनी निवडून कशाला दिलंय आणि ते काय करतायत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
 

संबंधित लेख