झुणका-भाकर केंद्र योजना सुरू करण्याची शिफारस : उद्धव ठाकरे 

पैसा वाटून, खोटी आश्वासने देऊन, भूलथापा मारून विश्वासघाताने निवडणुका जिंकण्यापेक्षा रोजगार, पोटापाण्याचा प्रश्न सोडवून मते मागणे हे कधीही चांगले. म्हणूनच झुणका-भाकर केंद्राची योजना महाराष्ट्र सरकारने पुन्हा सुरू करावी व ‘वडापाव’ गाड्यांची योजना राज्यभरात राबवावी अशी "शिफारस" शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखाद्वारे केली आहे.
झुणका-भाकर केंद्र योजना सुरू करण्याची शिफारस : उद्धव ठाकरे 

मुंबई : पैसा वाटून, खोटी आश्वासने देऊन, भूलथापा मारून विश्वासघाताने निवडणुका जिंकण्यापेक्षा रोजगार, पोटापाण्याचा प्रश्न सोडवून मते मागणे हे कधीही चांगले. म्हणूनच झुणका-भाकर केंद्राची योजना महाराष्ट्र सरकारने पुन्हा सुरू करावी व ‘वडापाव’ गाड्यांची योजना राज्यभरात राबवावी अशी "शिफारस" शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखाद्वारे केली आहे. 

श्रेयवादावरून राजकारणातील वेगवेगळे उदाहरण सांगून भाजपला चिमटे काढत उद्धव ठाकरे लिहतात, " जसे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत सध्या सुरू आहे. कर्जमुक्तीसाठी लढले कोण आणि श्रेय घेण्यासाठी पानभर जाहिराती देऊन मजा मारतेय कोण ! अर्थात श्रेय उपटणे आणि श्रेय लाटणे हा सध्याच्या राजकीय विचारसरणीचाच एक भाग बनला आहे. १० रुपयांमध्ये भोजन आणि पाच रुपयांमध्ये न्याहारी अशी एक उत्तम योजना कर्नाटक सरकारने जाहीर केली आहे व त्यावर सध्या टीकेचा मारा सुरू आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने कर्नाटक सरकारने मतदारांना भुरळ पाडण्यासाठी हे केले आहे वगैरे वगैरे आक्षेप आता तेथे विरोधक घेत आहेत. सरकार कोणाचेही असो, जनहितकारी आणि सामान्य माणसाच्या पोटापाण्याविषयी सुरू केलेल्या योजनांकडे राजकीय द्वेषाने पाहू नये अशी अपेक्षाही ठाकरे व्यक्त करतात. 

ते पुढे लिहतात, " महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे राज्य असताना (आजही तसे ते आहे) एक रुपयात पोटभर झुणका-भाकरीची योजना सरकारने सुरू केली होती. त्यामुळे सामान्यांच्या पोटापाण्याची सोय झाली होती, पण तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना झुणका पचनी पडला नाही. त्यांनी टीकेचा भडिमारच केला. शिवसेनेने झुणका-भाकर देऊन असे काय मोठे पाप केले होते? असा प्रश्न विचारत ठाकरे यांनी "झुणका भाकर केंद्राचा राग आळवला आहे. 

वेगवेगळ्या राज्यातील कल्याणकारी योजनांचा दाखल देत उद्धव ठाकरे लिहतात, " महाराष्ट्रात आधीच्या शिवसेना-भाजप सरकारच्या काळातील एक रुपयातील झुणका-भाकर असो, या योजना सामान्य जनतेचे पोट भरणाऱ्या आणि चूल पेटविणाऱ्या आहेत. गोरगरीबांच्या दृष्टिकोनातून हे बरेच आहे. अशा योजनांना राजकीय विरोध होऊ नयेत. किंबहुना म्हणूनच झुणका-भाकर केंद्राची योजना महाराष्ट्र सरकारने पुन्हा सुरू करावी व ‘वडापाव’ गाड्यांची योजना राज्यभरात राबवावी अशी शिफारस आम्ही देवेंद्र सरकारकडे करतो. वाटल्यास श्रेय वगैरे जे काही आहे ते तुम्हीच घ्या. अशा योजनांतूनच महाराष्ट्राला बरकत व गरीबांना रोजगाराची समृद्धी मिळेल ! अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com