Mumbai news - Subhash desai | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री देसाई यांच्यातील भेटीत काय घडले ?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

एमआयडीसी जमीन गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनामा दिला; मात्र हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नसल्याचे टीव्ही वृत्त आहे. 

पुणे : एमआयडीसी जमीन गैरव्यवहारप्रकरणी अडचणीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनामा दिला; मात्र हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नसल्याचे टीव्ही वृत्त आहे. 

गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांची चौकशी राज्याच्या लोकायुक्तांमार्फत, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची निष्पक्ष चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शुक्रवारी केली. मात्र, या निर्णयावर विरोधकांचे समाधान झाले नाही. महेता आणि देसाई या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. 

देसाई यांनी एका वृत्तवाहिनीशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले, ``मी काल सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना राजीनामा देण्याचा माझा निर्णय सांगितला. यावर ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज सकाळी मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याकडे राजीनामा दिला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला नाही."

संबंधित लेख