'स्वाभिमानी'तून सदाभाऊंची उद्या हाकलपट्टी ? 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष निर्णायक टप्प्यात आला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकारणीची तातडीची बैठक उद्या पुण्यात बोलावली आहे. या बैठकीत सदाभाऊंची हाकलपट्टी करण्यात येणार असल्याचे समजते.
'स्वाभिमानी'तून सदाभाऊंची उद्या हाकलपट्टी ? 

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष निर्णायक टप्प्यात आला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकारणीची तातडीची बैठक उद्या पुण्यात बोलावली आहे. या बैठकीत सदाभाऊंची हाकलपट्टी करण्यात येणार असल्याचे समजते.

खासदार राजू शेट्टी सध्या देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान पेटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्याचवेळी आपला एक सहकारी सत्तेत भागीदार असल्याने 'स्वाभिमानी'ला टीकेचा सामना करावा लागणार आहे. त्याचमुळे सदाभाऊंचे काय करायचे असा प्रश्न राजू शेट्टी यांना सतावत आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारणीची तातडीची बैठक उद्या पुण्यात बोलवण्यात आली आहे.

सदाभाऊ खोत यांनी संघटना व राजू शेट्टी यांच्या विरोधात वेळोवेळी वक्तव्य केली आहेत. खोत यांना आपल्या मुलाचा जिल्हा परिषदेत झालेला पराभव जिव्हारी लागला होता. 'खासदार राजू शेट्टी यांनी आयुष्यभर तत्वाचेच राजकारण करावे,' असा खोचक सल्ला देत 'गोफण तयार आहे. योग्यवेळी भिरकावण्यास तयार आहे,' असे सांगत खोत यांनी संघर्षाला सुरवात केली होती.  त्याचबरोबर सोशल मीडियातील बगलबच्चांना आवरा म्हणून राजू शेट्टींना दमही भरला होता. राजू शेट्टींच्या समर्थकांना सदाभाऊंनी दबाव आणून गप्प बसावले. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्यावर संघटनेतेच नाराजी वाढली आहे. 

स्वाभिमानीने सरकारमधून बाहेर पडावे यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. आत्मक्लेश यात्रेवेळीच सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची मागणी काही स्वाभिमानीच्या शिलादारांनी राजू शेट्टी यांच्याकडे धरली होता. कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय घेण्याची काही शिलेदारांनी शेट्टी यांच्याकडे मागणी केल्याने सदाभाऊंचा विषय लांबणीवर पडला होता. राजू शेट्टी यांनी सरकारला दिलेली एक महिन्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे मोठा निर्णय घेण्याची आवश्यकता राजू शेट्टी यांना भासत आहे. स्वाभिमानीला मिळणाऱ्या राजकिय ताकदीमुळे शेवटी कार्यकारीणीची बैठक घेतण्यात येणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत सदाभाऊंच्या हकालपट्टीची घोषणा करण्याची रणनिती राजू शेट्टींनी आखली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com