Mumbai news - NCP youth wing - kote-patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अभियानाला तरुणांचा प्रतिसाद : कोते-पाटील 

संजीव भागवत 
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

राष्ट्रवादी कॉंग्रेसची पाळेमुळे गावखेड्यांपासून ते शहरांतील प्रत्येक प्रभागात पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसला तरुणांकडून प्रतिसाद मिळत आहे. राज्यात हजारोंच्या संख्येंने तरुण राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नावाने एकत्र येत असून गावखेड्यांसोबत आता प्रत्येक शहरांमध्ये असलेल्या प्रत्येक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शाखाही मूळ धरत आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसची पाळेमुळे गावखेड्यांपासून ते शहरांतील प्रत्येक प्रभागात पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसला तरुणांकडून प्रतिसाद मिळत आहे. राज्यात हजारोंच्या संख्येंने तरुण राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या नावाने एकत्र येत असून गावखेड्यांसोबत आता प्रत्येक शहरांमध्ये असलेल्या प्रत्येक प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शाखाही मूळ धरत आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसची गाव तिथे शाखा आणि गाव तिथे राष्ट्रवादीचा झेंडा या अभिायानाला सुरूवात केली होती. मागील दीड महिन्यात हे अभियान राज्यात सुरू असून या अभियांनाला महाविद्यालयीन तरुण, बेरोजगार, शिक्षित, नोकरदार यांच्यासोबतच शेतकरी, कष्टकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत दीड महिन्याच्या काळातच गावखेड्यापासून ते शहरापर्यंत 450 अधिक शाखा सुरू झाल्या आहेत. त्या माध्यमातून शेकडो तरूण राष्ट्रवादीसोबत जोडले जात असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या गाव तिथे शाखा या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून शहरी भागातही आता हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पुणे, सातारा, सांगली, नगर, कोल्हापूर, परभणी, धुळे, नांदेड, आदी जिल्ह्यात हे अभियान पोहचले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण पुढे येत आहेत. यामुळेच शहरी भागातही राष्ट्रवादीच्या शाखा प्रत्येक प्रभागात सुरू करण्यासाठीच मोहीम वेगात असून आत्तापर्यंत सांगलीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 21 प्रभागात शाखा सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे पुणे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली 17, नाशिक जिल्हाध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील 28 हून अधिक तर नगर जिल्हयात 11 आणि इतर शहरांमध्येही प्रभाग तिथे शाखा सुरू करण्याचे काम वेगाने असल्याची माहितीही कोते-पाटील यांनी दिली. 

दरम्यान, विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस हाच एक पर्याय असल्याची भावना राज्यातील लाखो तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि रोजगारविषयक प्रश्‍नाकडे राष्ट्रवादीचा अपवाद वगळता कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडे तरुण आकर्षित होत असल्याचेही कोते-पाटील यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख