Mumbai News - MLA Jaikumar Gore | Sarkarnama

आमदार जयकुमार गोरे `मनोरा'च्या लिफ्टमध्ये अडकले

तुषार खरात
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई : लिफ्टमध्ये अडकण्याचे अनुभव सामान्य जनतेला सतत येत असतात. पण काल चक्क आमदारांवरांवरच लिफ्टमध्ये अडकण्याची वेळ आली, ती सुद्धा आमदारांसाठीच असलेल्या मनोरा या सरकारी निवासस्थानी.
मनोरा निवासस्थानातील 'अ' विंगमध्ये दहाव्या मजल्यावर १०६ क्रमांकाची आमदार जयकुमार गोरे यांची खोली आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवन करण्यासाठी आमदार गोरे लिफ्टने खाली जायला निघाले. सोबत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर, गोरे यांचे स्वीय्य सहाय्यक अभिजीत काळे यांच्यासह आणखी अनोळखी आठ-दहा जण होते. 

गोरे यांना घेऊन लिफ्ट तळमजल्यावर पोहोचली. पण लिफ्टचा दरवाजा किलकिला उघडला अन् पटकन बंद झाला. त्यामुळे कुणालाच लिफ्टमधून बाहेर येता आले नाही. एवढ्यात वर सहाव्या मजल्यावर कुणीतरी लिफ्टचे बटन दाबले, अन लिफ्ट तशीच वर गेली. सहाव्या मजल्यावर पोहोचल्यानंतर पुन्हा किलकिला दरवाजा उघडला अन् पटकन बंद झाला. लिफ्टसाठी जिथे कुठे बटन दाबले जायचे त्या माळ्यावर लिफ्ट जाऊ लागली. पण किलकिला दरवाजा उघडून पुन्हा बंद होत असल्याने कुणालाच बाहेर पडता येईना. साधारण पंधरा मिनिटे हा खेळ असाच सुरू राहिल्याने सगळेजण हैराण झाले. गोरे यांचे स्वीय्य सहाय्यक काळे यांनी पटकन तळमजल्यावरील काऊंटरवर फोन करून या प्रकाराची माहिती दिली. शेवटी कर्मचा-यानी लिफ्ट बंद करून आमदार गोरे यांच्यासह सगळ्यांची सुटका केली.
 
झाल्या प्रकाराने जयकुमार गोरे चांगलेच संतापले होते. लिफ्टमध्ये लिफ्टमन असणे गरजेचे आहे. पण लिफ्टमन नेमका त्यावेळी हजरच नव्हता. या निवासस्थानाची देखरेख शिंदे नावाच्या अभियंत्यांकडे आहे. त्यामुळे गोरेंनी शिंदेचा शोध घेतला. पण शिंदे महाशय सुद्धा कुठेतरी गायब झाले होते. शेवटी तणतणतच आमदार गोरे जेवन करण्यासाठी निघून गेले. 

संबंधित लेख