mumbai news - Mira-Bhayandar civic poll | Sarkarnama

मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे 'गुजराती'कार्ड

श्रीकांत सावंत
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी वाजत असताना आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी प्रत्येक पक्षातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिरा-भाईंदरमधील गुजराती समाजाची मतसंख्या लक्षात घेऊन या भागामध्ये शिवसेनेकडून गुजराती उमेदवारांना पसंती दिली असून त्यांच्या प्रचारासाठी गुजरातीमध्ये भाषणे देऊन मतदार राजाला खुश कऱण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ठाणे : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी वाजत असताना आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी प्रत्येक पक्षातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिरा-भाईंदरमधील गुजराती समाजाची मतसंख्या लक्षात घेऊन या भागामध्ये शिवसेनेकडून गुजराती उमेदवारांना पसंती दिली असून त्यांच्या प्रचारासाठी गुजरातीमध्ये भाषणे देऊन मतदार राजाला खुश कऱण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

गुजराती भाषण करण्याची जबाबदारी ओवळा-माजिवडा येथील आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक यांनी घेतली असून आपली आई देखील गुजराती असल्याचे सांगत आमच्या उमेदवारांना निवडून द्या, असे गुजराती साकडे घातले आहे. त्यांच्या या गुजरातीने मतदारांनी स्वागत केले असले तरी हा गुजराती फार्म्युला किती साथ देतो हे निवडणूकीनंतरच समजेल. 

मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक प्रचार ऐन रंगात आला असून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पुर्वेचे मित्रपक्ष पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मिरा-भाईंदरमधील गुजराती मतदारांच्या जोरावर भाजप येथील निवडणूक जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी करत असताना शिवसेनेनेही या ठिकाणी गुजराथी कार्ड वापरून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेने गुजराती उमेदवार दिले असून त्यांच्या प्रचारासाठी गुजराती भाषणही त्यांचे नेते देऊ लागले आहेत. 

ओवळा-माजीवडा मतदारसंघाचा भाग असल्यामुळे या भागात प्रताप सरनाईक यांच्याकडून मोठी तयारी केली जात आहे. त्यांचा मुलगा पुर्वेश हा देखील प्रचारामध्ये सक्रीय झाला आहे. कार्यकर्त्यांच्या गाडीवर जाऊन ऑम्लेब बनवणे, गुजराती खाण्याचे कौतुक करण्यासारखा फंडा पुर्वेश वापरताना दिसून येत आहे. दोन दिवसांपुर्वी शांतीनगर येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये पुर्वेश याने गुजराती भाषणाने निवडणूकीत शिवसेनेचे गुजराती कार्ड चालवण्याचा प्रयत्न केला. 

पुर्वेश याची आई परिषा सरनाईक या गुजराती असून त्यांच्यासह आपण ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो आहोत. गुजराथी छोकरा आणि त्याची आई ठाणेकरांचे प्रतिनिधीत्व करत आहे. तेथील लोकांनी जसा आम्हाला पाठिंबा दिला आहे तसा तुम्ही येथील शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यास पुर्वेश याने त्याच्या भाषणात सांगितले आहे. जर आम्ही ठाण्यात करू शकतो तर येथील गुजराती उमेदवारही महापालिकेमध्ये गुजराती माणसांचे नेतृत्व करू शकतात, असा दावा पुर्वेश याने केले आहे. पुर्वेश याच्या अडखळत आणि हिंदी-इंग्रजी मिश्रीत गुजरातीने उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

संबंधित लेख