Mumbai news - maratha morcha | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

शिवसागराच्या स्वागतासाठी आझाद मैदान फुलले; भगव्या झेंड्यांची आरास

ब्रह्मा चट्टे
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई : मराठा क्रांती मूक मोर्चाची वादळ मुंबईत दाखल झाले आहे. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत मराठा क्रांती मोर्चा मुंबईत येथे धडकले आहे. भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी आझाद मैदान मराठा शिवसागराच्या स्वागताला सज्ज झाले असून भगव्या झेंड्यांनी आझाद मैदान फुलून गेले आहे. 

मुंबई येथे राज्यभरातून आलेल्या लाखो मराठा बांधवांनी गर्दीची अंदाज घेत आझाद मैदानात जमायला सुरवात केली आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाचे वादळ राणीचा बाग भायखळ्यावरून सुरवात करत आझाद मैदानावर घोंगवणार आहे. यासाठी प्रशासनही सज्ज झाले असून मुंबईत येणाऱ्या मोर्चेकरांसाठी मुंबईच्या वाहतूकित बदल करण्यात आली आहे.

आझाद मैदान मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्वपक्षीय आमदार विधानभवनापासून एकत्र चालत आझाद मैदानकडे कुच केली. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमिवर मुंबईत पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. आझाद मैदान पासून मोर्चेकरी आपला मोर्चा मंत्रालयाकडे वळवू नये याची खास खबरदारी घेत जागो जागी बँरेकेटस लावून रस्ते बंद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक पकिसर मराठा बांधवांनी फुल्ल झाला आहे. मुंबई महापालिकेच्या समोरच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला भला मोठा झेंडा लावण्यात आला आहे. याठिकाणी मोर्चेकऱ्यांनी सेल्फी घेण्याचा सपाटा लावला असून भाखळ्यावरून निघणारा मोर्चा पोहचण्यापुर्वीच आझाद मैदान फुल्लं होण्यास सुरवात झाली आहे.

`सरकारनामा'वरील विश्लेषण, घडामोडींसाठी क्लिक करा :

संबंधित लेख