हाऊस कोण चालवतयं ? तुम्ही का अध्यक्ष ? : दिलीप वळसे-पाटील 

विरोधकांनी नियम 57 अन्वये केलेली चर्चेची मागणी अध्यक्षांनी अमान्य केल्यानंतर विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. त्यावर मग विधानसभेचे माजी अध्यक्ष अँड दिलीप वळसे पाटील हे बोलायला उभे राहिले. त्याचवेळी संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी हस्तक्षेप करीत अध्यक्षांनी निर्णय कळविला आहे, असे सांगत वळसे पाटील यांना बोलण्यास अडवले. त्यावर " हाऊस कोण चालवतयं ? तुम्ही का अध्यक्ष ?" असा सवाल बापट यांनी विचारला.
हाऊस कोण चालवतयं ? तुम्ही का अध्यक्ष ? : दिलीप वळसे-पाटील 

मुंबई : विरोधकांनी नियम 57 अन्वये केलेली चर्चेची मागणी अध्यक्षांनी अमान्य केल्यानंतर विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. त्यावर मग विधानसभेचे माजी अध्यक्ष अँड दिलीप वळसे पाटील हे बोलायला उभे राहिले. त्याचवेळी संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी हस्तक्षेप करीत अध्यक्षांनी निर्णय कळविला आहे, असे सांगत वळसे पाटील यांना बोलण्यास अडवले. त्यावर " हाऊस कोण चालवतयं ? तुम्ही का अध्यक्ष ?" असा सवाल बापट यांनी विचारला. 

विधानसभेच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तरे रद्द करुन नियम ५७ अन्वये चर्चेची केली मागणी. त्यावर अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी कर्जमाफीची चर्चेची मागणी लावून धरली. त्यावेळी विरोधकांची भूमिका मांडताना वळसे पाटील म्हणाले, " नियम 57 अन्वये प्रश्नोत्तराचा तास रद्द करून कर्जमाफीची चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यामुळे लगेच निर्णय घ्या, अशी विनंती वळसे पाटील यांनी केला. त्याचवेळी संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी अध्यक्षांनी निर्णय सांगितला आहे, परत परत कशाला तो विषय घेताय असं सांगत वळसे पाटील यांनी बोलण्यास अडवले. त्यावर " हाऊस कोण चालवतयं ? तुम्ही का अध्यक्ष ?" असा सवाल बापट यांनी विचारला. वाढलेला वाद बघून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, "293 चा प्रस्ताव प्रश्नउत्तरांचा तास रद्द करून घ्यावा असं कधीही घडले नाही. त्यामुळे प्रश्नउत्तराचा तास रद्द कराता येणार नसल्याचे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com