Mumbai News - Maharashtra Assembly Session- opposition demads resignation of desai-maheta | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

महेता-देसाई राजीनामे द्या; विरोधकांची विधान परिषदेत घोषणाबाजी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

जमीन लाटण्यासाठी भूमिहीन शेतकरी बिल्डर झाला, अशी खळबळजनक माहिती देत सुमारे 20 हजार कोटींची एमआयडीसीची जमीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बिल्डरांना दिल्याचा आरोप विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला. 

मुंबई : जमीन लाटण्यासाठी भूमिहीन शेतकरी बिल्डर झाला, अशी खळबळजनक माहिती देत सुमारे 20 हजार कोटींची एमआयडीसीची जमीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बिल्डरांना दिल्याचा आरोप विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला. 

या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी व चौकशी पुर्ण होईपर्यत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राजीनामा दयावा या मागणीसाठी विरोधकांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. प्रकाश महेता आणि देसाई हटाव या मागणीसाठी गदारोळ झाल्याने विधान परिषद दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
        
नाशिक येथील इगतपुरी येथील एमआयडीसीच्या जमिनीवरील आरक्षण उठवण्यासाठी अभय नहार, कमलेश वाघेचा आणि राजेश मेहता या विकासक असलेल्या धनाढ्य व्यक्तींनी गरीब शेतकरी असल्याचे सांगून प्रयत्न केले. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुंडे यांनी केली. या प्रकरणात विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केले असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सभागृहात प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी गोंधळ घातल्याने सभागृह  कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले

संबंधित लेख