Mumbai News - Maharashtra Assembly Session-MLA Yogesh Sagar | Sarkarnama

माणसं गेलीत अन् तुम्ही नियम पहाता : भाजप आमदार योगेश सागर

ब्रह्मा चट्टे
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई : "माणसं गेलीत अन् तुम्ही नियम पहाता. आमचं म्हणनं ऐका असा आग्रह भाजपचे आमदार योगेश सागर यांनी विधानसभा अध्यक्षांकडे धरला. विरोधकांनी घाटकोपर दुर्घटनेवर चर्चेची मागणी विधानसभेत केली होती. त्याला भाजप आमदार योगेश सागर यांनी भावना समजून घ्या, असे सांगत अध्यक्षांना साद घातली. 

विरोधकांच्या गोंधळाला भाजपचे आमदार योगेश सागर यांनीही विरोधकांना साथ देत, "आमच्या भावना लक्षात घ्या. दुर्घटना घडल्यानंतर 18 - 20 तास झाले तरी इमारतीखाली अडकलेल्यांना काढता आलेलं नाही. मग कोटीच्या कोटी रूपये खर्च केला जातो. याबाबत चर्चा व्हायला हवी. माणसं गेलीत अन् तुम्ही नियम पहाता. आमचं म्हणनं ऐका असा आग्रह अध्यक्षांकडे धरला.

विधानसभेच्या कामकाजला तिसऱ्या दिवशी सुरवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी नियम 57 अन्वये स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चर्चेचा प्रस्ताव फेटाळला. त्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. 

यावेळी निवेदन करताना अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार म्हणाले, "घाटकोपर घटना गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट देत चौकशीचे आदेश दिले आहेत. आम्ही चर्चेच्या तयारीत आहोत. सरकारच्या वतीने सविस्तर निवेदन करू." या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधी आमदारांनी गोंधळ करण्यास सुरवात केली. परिणामी विधानसभा पहिल्यांदा 10 मी. साठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर कामकाज सुरू होताच. विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्या त्यामुळे दुसऱ्यांदा 10 मीनीटांसाठी व तिसऱ्यांदा 15 मिनीटांसाठी विधानसभा तहकूब केली.

टॅग्स

संबंधित लेख