Mumbai News - Maharashtra Assembly Session-Maheta-desai | Sarkarnama

बळी कुणाचा जाणार, महेता की देसाईंचा?

गोविंद तुपे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

सरकारमधील मातब्बर मंत्र्याचे एका मागून एक घोटाळे समोर येत आहेत. त्यावर विरोधकही जोरदार आक्रमक झाले आहेत. विधानमंडळाच्या दोन्हीही सभागृहात मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी जोरदार लावून धरली आहे. अशा परस्थितीत सत्तेतील भाजप आपले गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांचा बळी देणार, की शिवसेनेच्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा बळी देणार यावरून विधानमंडळ परिसरात तर्क विर्तकांना  उधान आले आहे.

मुंबई : सरकारमधील मातब्बर मंत्र्याचे एका मागून एक घोटाळे समोर येत आहेत. त्यावर विरोधकही जोरदार आक्रमक झाले आहेत. विधानमंडळाच्या दोन्हीही सभागृहात मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी जोरदार लावून धरली आहे. अशा परस्थितीत सत्तेतील भाजप आपले गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांचा बळी देणार, की शिवसेनेच्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा बळी देणार यावरून विधानमंडळ परिसरात तर्क विर्तकांना  उधान आले आहे.

मागील आठवड्यापासून भाजपाचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या एमपी मिल कंम्पाऊंडच्या फाईलवरील शेऱ्यावरून विधनमंडळातील दोन्ही सभागृहात विरोधकांनी महेता यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. त्यातच शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचाही एमआयडीसीमधील जमिन  घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे विरोधकांनी दोन्हीही मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीवर दोन्ही सभागृहे दनानून सोडली आहेत.

सुभाष देसाई यांचा जुनाच जमिन घोटाळा नव्याने याच वेळेस विरोधकांच्या माध्यमातून मांडून भाजप विरोधकांचे महेता वरील लक्ष विचलित करण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे महेतांच्या शेऱ्यावरून अडचणीत आलेले सरकार नक्की बळी कुणाचा देणार याची सुरस चर्चा विधानमंडळ आणि मंत्रालय परिसरात रंगली आहे.

संबंधित लेख