शेतक-यांची जात मारायची ठरवली काय? : धनंजय मुंडे

कर्जमाफीसाठी शेतक-यांची अडवणूक केलेली असतानाच आता पीकविम्यासाठीही सरकारडून निर्णय घेण्यासाठी पुन:पुन्हा चुका केल्या जात आहेत. या सरकारला राज्यातील शेतक-यांची जातच मारायची आहे काय, असा सवाल विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
शेतक-यांची जात मारायची ठरवली काय? : धनंजय मुंडे

मुंबई : कर्जमाफीसाठी शेतक-यांची अडवणूक केलेली असतानाच आता पीकविम्यासाठीही सरकारडून निर्णय घेण्यासाठी पुन:पुन्हा चुका केल्या जात आहेत. या सरकारला राज्यातील शेतक-यांची जातच मारायची आहे काय, असा सवाल विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

शेतक-यांना अशा प्रकारची वागणूक देताना सरकारला लाज वाटते का, असा सवालही त्यांनी करत शेतक-यांच्या पीकविम्याची मुदत वाढवून दिली जात नाही तोपर्यंत हे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा आज दिला. त्यांनंतर सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याने सभापतींनी दोन वेळा 15-15 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

विधानपरिषदेचे कामकाज सुरू होताच सभापती राजराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रश्नोतरे पुकारले, मात्र त्याच वेळी मुंडे यांनी राज्यातील शेतक-यांना पिक विम्यांची मुदतवाढ देण्यासासाठीचा विषय २८९ च्या प्रस्तावादवारे मांडत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात‍ आज पिकविम्यांची मुदत संपली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, त्यातच यादरम्यान सरकारकडून एकीकडे ऑनलाइन अर्ज भरण्याची सक्ती केली, यामुळे ही सर्व‍  परिस्थिती निर्माण‍ झाली असून त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचेही मुंडे म्हणाले. बीड जिल्ह़यातील हजारो शेतक-यांनी पिकविम्यासाठी अर्ज केलेला असतानाही त्याना त्याचा कसा लाभ मिळाला नाही, याची आकडेवारी वाचून दाखवली. त्यामुळे ३० जुलैची मुदत वाढवून द्वयावी अशी मागणी केली.

दरम्यान कृषिमंत्री पांडुरंग  फुंडकर यांनी आम्ही 15 ऑगस्टपर्यंत ही पिकविम्याची मुदतवाढ घेण्यासाठी केंद्राकडे आग्रही असल्याची माहिती दिली. एकाही शेतकऱ्यांना या पीकविम्यापासून वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही दिली. यामुळे सभापतींनी पिकविम्यासाठीची 289ची सूचना नाकारली असल्याचे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com