एकनाथ खडसेंच्या बाजूने विरोधकांची घोषणाबाजी

`खडसे उपाशी, महेता तुपाशी' अशा घोषणा देत विरोधकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा उल्लेख केला. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेतांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधकांचा गोंधळ वाढल्याने कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.
एकनाथ खडसेंच्या बाजूने विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई : `खडसे उपाशी, महेता तुपाशी' अशा घोषणा देत विरोधकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा उल्लेख केला. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेतांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधकांचा गोंधळ वाढल्याने कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले.

आज सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच नियम 57 अन्वये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करून प्रकाश महेता मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे व एमएसआरडीएचे संचालक राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करावे, अशी मागणी केली. त्यावर विरोधी पक्षांची चर्चेची मागणी अमान्य करत तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी प्रश्नोत्तरांचा तास पुकारला. त्याविरोधात विरोधीबाकावरून हरकत घेत घोषणाबाजी सुरू केली. विरोध वेलमध्ये उतरून सरकारविरोधी घोषणा देत होते. त्यावेळी विरोधकांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बाजूने घोषणाबाजी केली.

जयंत पाटील म्हणाले, "प्रकाश महेता यांचे नवे प्रकरण आम्ही सादर करतोय. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम राज्याच्या मुख्यमंत्री करत आहे. हे गंभीर आहे. आम्ही नवे प्रकरण मांडत आहोत. मात्र तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी प्रश्नोत्तरे सुरूच ठेवण्याचे आदेश दिले. विरोधक वेलमध्ये उतरून सरकारविरोधी घोषणा देत होते. गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधकांनी गोंधळ सुरू केला.''

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, की आज प्रकाश महेतांच्या संबंधीत दोन महत्त्वाच्या बाबी समोर आणल्या आहेत. स्वत: महेतांनी सांगितलयं की, "मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलं नव्हतं. मग त्यांना का पाठिशी घालताय ? जसं मोपलवारांना पदापासून दूर केलं तसं प्रकाश महेतांना पदावरून बाजूला कराना. ते मंत्री पदावर असताना कशी चौकशी करणार आहात ? असा प्रश्न पवार यांनी विचारला. 

त्यावर संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी "तुम्हाला काय सांगायचाय ते प्रश्नोत्तराच्या तासानंतर संधी दिली जाईल तेव्हा सांगा," असे सांगत प्रश्नोत्तरांचे तास सुरूच ठेवला. त्यामुळे चिडलेले विरोधक वेलमध्ये उतरले. विरोधकांनी पुन्हा सरकारविरोधी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरवात केली. विधानसभेत विरोधकांनी ,'प्रकाश मेहता का उलटा चष्मा, मी मुख्यमंत्र्यांची दिशाभुल केली. पण राजीनामा देणार नाही,' असा मजकूर लिहलेला फलक फडकवत घोषणाबाजी सुरूच ठेवली. भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, गलीगली में शोर है भाजप सरकार चोर है, खडसे साहेबांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. विरोधक सरकारविरोधी घोषणा देत डायसवर चढले होते. विरोधकांच्या गोंधळातच प्रश्नोत्तरांचा तास सुरू होता. गोंधळ वाढल्याने कामकाज 10 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com