सांगलीतील "त्या" महिलेच्या आरोपाची चौकशी करा; विधानसभेत विरोधकांचा गदारोळ 

सांगलीतील "त्या" महिलेच्या आरोपाची चौकशी करा; विधानसभेत विरोधकांचा गदारोळ 

मुंबई : सांगलीतील "त्या" महिलेच्या आरोपाची चौकशी करा, त्या महिलेने एका राज्यमंत्र्यावर लैंगिक आत्याचाराचे आरोप केले आहेत. त्या राज्यमंत्र्यांचे नाव न घेता चौकशी करण्याची मागणी विधानसभेत विरोधकांनी केली. त्यामुळे त्यांचे नाव घेतले नाही तर चौकशी कुणाची करायची असा प्रश्न विचारला गेला. त्यामुळे पत्रकार परिषद घेत त्या महिलेने आरोप केले आहेत. त्यामुळे चौकशीची मागणी करत विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला.

प्रश्नोत्तराच्या तास संपल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी "त्या" महिलेवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, मी त्यांना नोटीस दिली नसल्याने त्यांचे नाव घेवू शकत नाही. माझ्याकडे सीडी आहे. वाटल्यास तुमच्या दालनात तुम्हाला दाखवतो. मात्र सांगलीतील महिलेने राज्यमंत्र्यांवर लैंगिक आत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेत त्या महिलेने न्यायाची मागणी पत्रकारांकडे केली आहे. "त्या महिलेने लिहलेले पत्र अजित पवार यांनी विधानसभेत वाचून दाखवले. त्यानंतर या संपुर्ण प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. 

त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, "तुम्ही नाव न घेता सांगत आहात. मग कशी चौकशी करायची ? " अध्यक्षांनी असा प्रतिप्रश्न विचाराल्यानंतर विरोध आपल्या म्हण्यावर ठाम होते. विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करायचे आदेश तरी द्या अशी मागणी अध्यक्षांकडे केली. त्यावर अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सरकारला दिले.
 
त्यावर नाराजी व्यक्त करत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी "त्या" महिलेने गुन्हा मागे घेतला असल्याचे निदर्शनास आणू दिले. तरीही विरोधक आपल्या म्हणण्यावर ठाम होते. राज्यमंत्र्यांवरच्या आरोपावर नाव न घेता विधानसभेत विरोधकांनी चौकशीची मागणी करत गोंधळ घातला. महिलांवर अन्याय करणाऱ्या सरकराचा धिक्कार असो अशी घोषणा करत विरोधकांनी सभात्याग केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com