Mumbai news - Mahadev Jankar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

महादेव जानकर यांना पसंत पडेनात अधिकारी

तुषार खरात
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई : पशु, दुग्ध व मत्स्यविकास (पदुम) मंत्री महादेव जानकर यांना त्यांच्या मनासारखे अधिकारी कुठून शोधून द्यायचे असा गहन प्रश्न सरकारपुढे उपस्थित झाला आहे. एका उपसचिवाच्या नियुक्तीवरून सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी `सरकारनामा`ला सांगितले.

मुंबई : पशु, दुग्ध व मत्स्यविकास (पदुम) मंत्री महादेव जानकर यांना त्यांच्या मनासारखे अधिकारी कुठून शोधून द्यायचे असा गहन प्रश्न सरकारपुढे उपस्थित झाला आहे. एका उपसचिवाच्या नियुक्तीवरून सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी `सरकारनामा`ला सांगितले.

साधारण पंधरा दिवसांपूर्वी खुल्लर यांच्या आदेशाने सामान्य प्रशासन विभागामार्फत देवाप्पा गावडे नावाच्या उपसचिवांची पशु, दुग्ध व मत्स्य विकास खात्यात नियुक्ती करण्यात आली. पण हे अधिकारी माझ्या खात्यात नको, असे सांगत जानकर यांनी कडाडून विरोध केला. वास्तविक गावडे हे चांगले अधिकारी आहेत. प्रशासकीय कामावर त्यांची उत्तम पकड आहे, असे असतानाही त्यांच्या नावाला झालेला विरोध पाहून मंत्रालय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. 

खुल्लर यांनी तर ही बदली रद्द करण्यास नकार दिला. गावडे यांची ज्या खात्यात बदली केली आहे, त्याच खात्यात ते काम करतील अशी निकराची भूमिका खुल्लर यांनी घेतली. पदुम हे खाते कृषी खात्यासोबत संलग्न आहे. त्यामुळे शेवटी गावडे यांची कृषी खात्यात नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

वास्तविक, जानकर व त्यांचे खासगी सचिव भागवत मुरकुटे यांनी आदिवासी विकास खात्यातील सुनील शिंदे यांना या उपसचिव पदावर घेण्यासाठी हट्ट धरला आहे. पण खात्यातील अधिका-यांच्या नियुक्ती करण्याचे अधिकार सरकारचे आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने या जागेवर गावडे यांची नियुक्ती केली होती.

विशेष म्हणजे, यापूर्वी सुद्धा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकून नियुक्त केलेल्या एका अधिका-यालाही जानकर यांनी विरोध केला होता. जानकर यांच्या कार्यालयात काम करणा-या एका लिपीकानेही  विनंती करून दुस-या खात्यात बदली करून घेतली होती.

याबाबत जानकर यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी फोन उचलला नाही. त्यांचे खासगी सचिव मुरकुटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ``त्या जागेवर सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्याबाबत मंत्र्यांनी अगोदरच सुचना केली होती. त्यामुळे गावडे यांच्या नियुक्तीला नकार देण्यात आला. शिंदे यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल.''  

संबंधित लेख