सरकारची दूध दरवाढ फसवी  

मोठा गाजा-वाजा करीत राज्य सरकारने दूध उत्पादक शेतक-यांना तीन रुपयांची दरवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात या वाढीव दरातील फुटकी कवडीदेखील पडली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. सरकारच्या या निर्णयाला खासगी दूध संघांनीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सरकारने फसवी दूध दरवाढ केल्याची टीका शेतकरी संघटना करीत आहेत.
सरकारची दूध दरवाढ फसवी  

मुंबई : मोठा गाजा-वाजा करीत राज्य सरकारने दूध उत्पादक शेतक-यांना तीन रुपयांची दरवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात या वाढीव दरातील फुटकी कवडीदेखील पडली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. सरकारच्या या निर्णयाला खासगी दूध संघांनीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सरकारने फसवी दूध दरवाढ केल्याची टीका शेतकरी संघटना करीत आहेत. 

पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागातील सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रदत्त समितीने सादर केलेल्या अहवालानुसार राज्य सरकारने ग्राहकांवर कुठलाही बोजा न लादता दूध दरवाढीस मान्यता दिली होती. त्यानुसार दूध खरेदी दरात प्रति लिटर तीन रुपयांनी वाढ केल्यामुळे गायीचे दूधदर 24 रुपयांवरून 27 रुपये तर, म्हसीचे दूध दर 33 रुपयांवरून 36 रुपये होतील, असे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात जुन्याच दराने रक्कम सल्याचे सांगोल्याचे शेतकरी किसन पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे नविन दरवाढी नुसार पैसे का देत नाही आहात असा जाब विचारला असता उडवा उडवीची उत्तरे दूध संकलन केंद्राने मिळत आहेत. सगळीकडूनच आडचणीत आल्याने आणि पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकरी मिळेल ती किमंत निमूटपणे स्वीकारत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

खासगी दुध संघ शासनाच्या आदेशाचे पालन करीत नाहीत, तसेच सहकारी तत्वावर उभ्या असलेले संघही याला बग़ल देत आहेत याबाबत महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क साध्या असता. आमच्याकडे अशी कोणतीही तक्रार अद्याप आलेली नाही. ज़र अशी काही तक्रार आली तर कारवाई केली जाईल असे शिंदे यांनी सांगितले. तक्रारी आणि कारवाईच्या याफार्समध्ये दुग्ध उत्पादक शेतकरी तुर्तास तरी नाडला जात असल्याचे चित्र सध्या तरी जैसे थेच आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com