mumbai news - ghatkopar - assembly session | Sarkarnama

भाजप आवळणार सितपविरुद्ध चौकशीचा फास

सुचिता रहाटे
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई : घाटकोपरमधील साईदर्शन इमारत दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली असून, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या १५ दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे दुर्घटनाप्रकरणी अटकेत असलेल्या सुनील सितपविरुद्ध भाजप चौकशीचा फास आवळणार, हे निश्चित.  

साईदर्शन या इमारतीच्या तळमजल्यावर सितप याचे नर्सिंग होम होते. या नर्सिंग होमच्या नूतनीकरणावेळी मोठया जागेसाठी सितप याने इमारतीचे दोन खांब तोडले. त्याने नूतनीकरणासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्याने हे बांधकाम केले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. 

सुनील सितप हा घाटकोपरमध्ये केबल ऑपरेटर म्हणून काम पाहत होता. महापालिका निवडणुकीत सितप याच्या पत्नीला शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, या मतदारसंघातील मनसेचे माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या पत्नीने त्यांचा पराभव केला. सितप याच्या अरेरावीपणामुळेच शिवसैनिकांनी भालेराव यांच्या बाजूने कौल दिला होता.

या चार मजली इमारतीमध्ये एकूण 16 कुटुंब वास्तव्यास होती. त्यातील मृतांचा आकडा 17 वर पोहचला आहे. ढिगाऱ्याखाली अजून किमान 30 जण अडकले असल्याची शक्यता प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना प्रथम बाहेर काढले पाहिजे. दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक शिक्षा होईल, असे आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले.

संबंधित लेख